SCO Summit 2022 : भारताने समरकंद शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवल्यावर चीनने केले अभिनंदन

SCO Summit 2022 : भारताने समरकंद शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवल्यावर चीनने केले अभिनंदन
Published on
Updated on

समरकंद; पुढारी ऑनलाईन : शुक्रवारी (दि.१६) समरकंद येथे आयोजित करण्यात आलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO Summit 2022) या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हजेरी लावली. यावेळी या परिषदेचे अध्यक्षपद भारताला भूषवण्याची संधी मिळाली. या निमित्ताने चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping)यांनी भारताने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले.

यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हस्तांदोलन केले. पुढील वर्षी परिषदेचे (SCO Summit 2022) आयोजन करण्यासाठी चीन भारताला मदत करेल, असे शी जिनपिंग यांनी सांगितले. शी जिनपिंग यांच्या वक्तव्यावरून असे दिसते की पुढील SCO शिखर परिषद भारतात होणार आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील लष्करी तणावानंतर दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख प्रथमच आमनेसामने आले.

तत्पूर्वी, उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत (SCO Summit 2022) पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्हाला भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे." दरम्यान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये व्यवसाय आणि राजकारण या विषयांवर चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग गुरुवारी झालेल्या औपचारिक डिनर आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) प्री-कॉन्फरन्स ग्रुप इव्हेंटमध्ये सहभागी झाले नाहीत. समरकंदमध्ये सर्वात अखेरीस पोहचणाऱ्या नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. यामुळे त्यांनी शिखर परिषदेपूर्वी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news