The Great Khali : प्रसिध्द रेसलर ‘दि ग्रेट खली’ BJP च्या रिंगणात!

The Great Khali : प्रसिध्द रेसलर ‘दि ग्रेट खली’ यांचा भाजपमध्ये प्रवेश!
The Great Khali : प्रसिध्द रेसलर ‘दि ग्रेट खली’ यांचा भाजपमध्ये प्रवेश!
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दि ग्रेट खली (The Great Khali) या नावाने जागतिक पातळीवरील डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) स्पर्धांमध्ये प्रसिध्द असलेल्या दलीप सिंह राणा यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मूळचे हिमाचल प्रदेशचे असलेल्या राणा यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्व घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.

असा कोणता देश राहिला नसेल की ज्याठिकाणी मी रेसलिंग केलेले नसेल. पैसे कमवायचे असते तर अमेरिकेतच राहिलो असतो. पण देशाप्रती प्रेम असल्यामुळे मी भारतात परत आलो. मोदी आणि भाजपच्या विचारधारेने आपण प्रभावित झालो आहे. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला योग्य पंतप्रधान मिळाला आहे, असेही राणा (The Great Khali) यांनी यावेळी सांगितले.

गतवर्षी खली (The Great Khali) समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना भेटले होते, मात्र त्यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली, हे समोर आले नव्हते. 7 फूट 1 इंच उंची असलेल्या द ग्रेट खली (The Great Khali) यांनी डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) प्रमाणे चित्रपटांतही काम केलेले आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. 'डब्ल्यूडब्ल्यूई'मध्ये (WWE) जाण्यापूर्वी ते पंजाब पोलिसमध्ये एएसआय पदावर कार्यरत होते.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी WWE कुस्तीपटू द ग्रेट खली उर्फ ​​दिलीप सिंग राणा यांनी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व मिळवून त्यांनी शड्डू ठोकला आहे. खली यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे पंजाबच्या राजकारणात काही वेगळा संदेश जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी 2021 मध्ये द ग्रेट खलीने आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली होती, त्यावेळी या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर खली हे आम आदमी पक्षात सामील होणार अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. मात्र खली यांनी भाजपचे कमळ हातात घेऊन विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news