WTC Final : भारताच्या विजयाने 5 देशांना झटका दिला, जाणून घ्या डब्ल्यूटीसी फायनलचे समीकरण

WTC Final : भारताच्या विजयाने 5 देशांना झटका दिला, जाणून घ्या डब्ल्यूटीसी फायनलचे समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) शर्यतीत आगेकूच केली आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 70.83 आणि भारताची 61.67 झाली आहे.

भारताच्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. मात्र, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला अजूनही डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या आणि दक्षिण चौथ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया कसे पात्र होऊ शकते (WTC Final)

डब्ल्यूटीसी फायलनपूर्वी भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे फक्त तीन सामने बाकी आहेत. तथापि, नागपूर कसोटीत भारताने कांगारूंचा दारुण पराभव केला असला तरी, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण जर कांगारूंना भारताने 4-0 ने क्लिनस्विप दिला तर त्यांच्या विजयाची टक्केवारी 59.64 होईल. पण जर, पुढील तीनपैकी एका कसोटीत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 64.9, तर अनिर्णित राहिल्यास 61.40 अशी होईल. अशातच त्यांना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. पुढील आठवड्यापासून ही मालिका सुरू होणार आहे.

टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनलच्या जवळ (WTC Final)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने विजय मिळवताच सलग दुसऱ्या डब्ल्यूटीसी फायनलच्या जवळ येण्यास मदत झाली आहे. टीम इंडियाला फायनलसाठी पात्र व्हायचे असल्यास पाहुण्या कांगारूंविरुद्धच्या उर्वरित तीनपैकी दोन कसोटी जिंकणे आवश्यक आहे. ज्यामुळे भारताच्या टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 62.50 होईल आणि तिसर्‍या क्रमांकावरील श्रीलंकेला शर्यतीतून बाहेर पडेल. पण जर पुढील तीन कसोटींमध्ये पराभव किंवा नकारात्मक निकाल लागल्यास टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेवर अवलंबून राहावे लागेल.

श्रीलंकेची आता एकच मालिका शिल्लक आहे. मार्चमध्ये हा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार असून तिथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. मात्र लंकेचे किवींच्या भूमीवरील रेकॉर्ड पाहता त्यांना आतापर्यंत 19 सामन्यांत फक्त दोनदाच विजय मिळवता आला आहे. मात्र, अगामी मालिकेत जर श्रीकंकेने न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांच्या विजयाची टक्केवारी 61.1 होईल. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने भारताला पुढील तीन कसोटींमध्ये पराभूत केल्यास श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर येण्याची दाट शक्यता आहे. पण जर किवींनी श्रीलंकेला विजयापासून रोखले तर हा संघ डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीतून आपसूकच बाहेर पडेल.

द. आफ्रिकेची शक्यता कमीच

दुसरीकडे, भारताच्या विजयाने चौथ्या क्रमांकावर असलेल्या द. आफ्रिकेच्या संधी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. 28 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजचा द. आफ्रिका दौरा सुरू होईल. पण भारताचा आणखी एक विजय द. आफ्रिकेला फायनलच्या शर्यतीतून बाहेर काढेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news