पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोरंजनाच्या दुनियेत एक दमदार संवाद एखादे दृश्य, चित्रपट आणि काहीवेळा संपूर्ण करिअर बनवू शकतो. आता चर्चा होत आहे ती ब्लॉकबस्टर जवानमधील डायलॉग्जची. तुम्हाला माहितीये का, जवानमधील सुपर डायलॉग्ज (Jawan) लेखक सुमित अरोराने लिहिले आहेत. "जवान," "दहाड," आणि "गन्स अँड गुलाब्स" सारख्या यशस्वी चित्रपटातील डायलॉग्ज या लेखकाच्या लेखणीतून उतरले आहेत. सुमितने आतादेखील हे सिद्ध केले आहे की, तो केवळ प्रेक्षकांमध्येच नाही तर इंटरनेटवरही तुफान लोकप्रियता मिळवून देणारे संवाद रचण्यात मास्टर आहे. (Jawan)
सुमितने नुकत्याच आलेल्या जवान या चित्रपटात असे अनेक ब्लॉकबस्टर संवाद लिहिले आहेत. "जब में खलनायक बनता हूं ना तो मेरे सामने कोई भी हीरो टिक नही सक्ता." "चाहिए तो आलिया भट्ट, पर उमर में छोटी छोटी है" "मैं हू भारत का नागरीक. बार बार नये लोगो को वोट देते हु, लेकीन कुछ नहीं बदलता हू." "राठोर, विक्रम राठोर…नाम तो सुना होगा!" "जेल में आदमी तेरे हैं, पर ये जेल मेरी औरतों का है" "हम जवान हैं. अपनी जान हजार बार दाव पे ला सक्ते हैं, लेकीन सरफ देश के लिए." "मैं कौन हूं, कौन नहीं, पता नहीं… माँ का किया वादा हूं, या अधूरा एक इरादा हूं." "मैं अच्छा हूं, बुरा हूं, पुण्य हूं या पाप हूं… ये खुद से पूछना, क्यूओकी मैं भी आप हूं" "पांच घनते चलने वाली मच्छर कॉइल के लिए कितने सचल करते हो…लेकिन पांच साल तक अपनी सरकार चुनते वक्त एक प्रश्न नाही करते, कुछ नहीं पूछते."