WPL Auction : स्मृती मानधनाला आरसीबीने 3.4 कोटींमध्ये घेतले विकत

WPL Auction : स्मृती मानधनाला आरसीबीने 3.4 कोटींमध्ये घेतले विकत

पुढारी ऑनलाईन डेस्क : Womens IPL Auction : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावर महिला आयपीएल लिलावाची अनुक्रमे पहिली आणि दुसरी बोली लागली. या दोन्ही खेळाडूंची बेस प्राईज 50 लाख होती. अपेक्षेप्रमाणे स्मृती आणि हरमनप्रीत यांना खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींनी पैसा खर्च केला. अखेरीस आरसीबीने मानधना तर मुंबई इंडियन्सने हरमनप्रीत कौरला आपल्या संघात समावेश करून या लिलावाच्या स्पर्धेत बाजी मारली.

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स संघाने मानधनासाठी जोरदार बोली लावली. पण अखेरीस आरसीबीने बाजी मारली आणि 3.40 कोटींना मानधानला विकत घेऊन आपल्या संघात समाविष्ट केले. पहिल्या सेटमध्ये ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.

हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सकडे

स्मृती मंधानानंतर हरमनप्रीत कौरसाठी बोली लागली. तिचीसुद्धा मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात स्पर्धा होती. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सनेही स्वारस्य दाखवले. अखेर मुंबई इंडियन्सने हरमनप्रित कौरला 1 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केले.

सोफी एक्लेस्टोनला यूपी वॉरियर्सने विकत घेतले

गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनला खरेदी करण्यासाठी स्पर्धा झाली. सोफीची मूळ किंमत 50 लाख होती. यूपी वॉरियर्सने तिला खरेदीसाठी स्वारस्य दाखवले आणि 1 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केले.

एलिस पॅरीचाही आरसीबीमध्ये समावेश

ऑस्ट्रेलियाची एलिस पेरीवरील बोलीही आरसीबी संघाने जिंकली. पेरीला आरसीबीने 1.70 कोटी रुपयांना खरेदी केले. इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनला यूपी वॉरियर्सने 1.8 कोटी रुपयांना विकत घेतले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू अॅशले गार्डनरला गुजरात जायंट्सने 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले. वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजला पहिल्या बोलीत कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तिची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

विंडीजच्या हेली मॅथ्यूजला कोणीही विकत घेतले नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅशले गार्डनरला गुजरात जायंट्सने 3.20 कोटी रुपयांना खरेदी केले.

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 50 लाख रुपयांना विकत घेतले.

भारताची स्टार वेगवान गोलंदाज रेणुका सिंहला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ताहिला मॅकग्राला यूपी वॉरियर्सने 1.40 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार नताली स्कायव्हरला मुंबई इंडियन्सने 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया कारला मुंबई इंडियन्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलला यूपी वॉरियर्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज बेथ मुनीला गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

भारताची स्टार फलंदाज शेफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगला दिल्ली कॅपिटल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. ती दिल्लीची कर्णधार बनू शकते.

दिल्लीने भारताची स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जला 2.20 कोटींना विकत घेतले. तिची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकले हिला गुजरात जायंट्सने 60 लाख रुपयांना विकत घेतले. तिची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

WPL चा लोगो लाँच

महिला प्रीमियर लीगचा लोगो लाँच करण्यात आला. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएल कमिश्नर अरुण धुमल यांच्या हस्ते लोगो लाँच करण्यात आला करण्यात आले.

WPL लिलावाच्या पाचही फ्रँचायझींची नावे?

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ दिसणार आहेत.

या परदेशी खेळाडूंवर नजर

WPL 2023 लिलावात 14 परदेशी खेळाडूंची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 6 खेळाडूंचा समावेश आहे. अॅशले गार्डनर, एलिस पेरी, मेग लॅनिंग, अॅलिसा हिली, जेस जोनासेन आणि डार्सी ब्राउन.

इंग्लंडच्या सोफिया एक्स्टन, नेट सीव्हर ब्रंट, कॅथरीन सीव्हर ब्रंट आणि डेनी व्हायटे यांना 50 लाखांची बेस प्राईज मिळाली आहे. याशिवाय न्यूझीलंडची सोफी डेव्हाईन, दक्षिण आफ्रिकेची सिनालो जाफ्ता, वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन आणि झिम्बाब्वेची लॉरीन फिरी यांचाही यात समावेश आहे.

WPL चा लोगो लाँच

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news