WPL 2024 Final : महिला प्रीमियर लीगची आज फायनल; दिल्ली भिडणार रॉयल चॅलेंजर्सशी

WPL 2024 Final : महिला प्रीमियर लीगची आज फायनल; दिल्ली भिडणार रॉयल चॅलेंजर्सशी
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : महिला प्रीमियर लीग 2024 च्या सेमी फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणारी आरसीबी आज रविवारी दिल्ली कॅपिटल्ससोबत भिडणार आहे. दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून दिल्लीने सलग दुसर्‍या हंगामात अंतिम फेरी गाठली आहे.

गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी फार चांगली नव्हती. मात्र या हंगामात त्यांनी जोरदार कमबॅक केले. आरसीबी पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे ते पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी जीवाचे रान करतील यात शंका नाही. दुसरीकडे पहिल्या हंगामात हुलकावणी दिलेल्या विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी दिल्ली देखील सगळा जोर लावेल. त्यामुळे यंदाचा फायनल सामना हा दमदार होईल.

WPL 2024 Final : वुमेन्स प्रीमियर लीगच्या विजेत्याला किती मिळणार बक्षीस रक्कम?

महिला प्रीमियर लीग 2023 चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले होते. त्यावेळी त्यांना विजेते म्हणून 6 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली होती; तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटी रुपये मिळाले होते. यंदाच्या प्रीमियर लीग विजेत्यांना किती रक्कम मिळणार याबाबत बीसीसीआयने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षीस रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

WPL 2024 Final : संघ यातून निवडणार

दिल्ली कॅपिटल्सचा संघ : मेग लेनिंग (कर्णधार), तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, एलिस कॅप्सी, मारिजान कैप, शिखा पांडे, एनाबेल सदरलँड, जेस जॉनासन, मिन्नू मणी, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, तितास साधू, राधा यादव, अश्वनी कुमारी, अपर्णा मोंडाल, स्नेहा दिप्ती

रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष, दिशा कसत, मेघना, इंद्रानी रॉय, शुभा सतीश, सिमरन भादुर, नदीन डे क्लर्क, सोफी डिवाईन, श्रेयांका पाटील, एलिस पेरी, एकता बिष्ट, केट क्रॉस, सोफी मोलीन्यूक्स, रेणुका ठाकूर सिंग, जियोर्जिया, श्रद्धा पोखारकर, आशा शोभना.

WPL 2024 Final : मी बाद झाल्याने पराभव : हरमन

फायनल गाठू न शकल्याने मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर नाराज दिसली. पराभवानंतर हरमनप्रीत म्हणाली की, शेवटच्या 12 चेंडूंमध्ये आम्हाला फक्त एका चौकाराची गरज होती. मात्र आम्ही तसे करण्यात यशस्वी होऊ शकलो नाही. मी आऊट झाल्यानंतर आमचे फलंदाज दडपणाखाली आले आणि हा या सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news