WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कुकाबुरा चेंडूवर

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कुकाबुरा चेंडूवर
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही ऑस्ट्रेलियन कुकाबुरा बॉलवर खेळवण्यात येणार आहे. ही फायनल 7 जूनपासून ओव्हलवर खेळवण्यात येणार आहे. (WTC Final 2023)

दोन्ही संघांनी कुकाबुरा चेंडूवर फायनल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रिकी पाँटिंगने आयसीसीने ड्यूकऐवजी कुकाबुरा चेंडूला पसंती दिल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केले. (WTC Final 2023)

रिकी पाँटिंग म्हणाला होता की, 'हा सामना ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा आणि भारताची वरची फळी असा असेल, या विचारानेच तोंडाला पाणी सुटले आहे. सर्वसाधारणपणे द्वंद्व हे भारतीय फिरकीपटू आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज असे असते. ही शक्यता ओव्हलवर नाकारता येणार नाही. ओव्हलची खेळपट्टी ही सहसा फलंदाजांसाठी चांगली असते तसेच ती काही प्रमाणात फिरकीला देखील साथ देते.

गेल्या वर्षी इंग्लंडने न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ड्यूक बॉलबाबत तक्रार केली होती. हा चेंडू लवकर आपला आकार गमावतो, सॉफ्ट होतो आणि स्विंग हरपतो. यावेळी ड्यूक बॉल तयार करणार्‍या कंपनीचे मालक दिलीप जजोदिया यांनी चेंडूच्या टॅनिंग प्रोसेसवेळी यात काही तांत्रिक अडचण आली असेल, असे उत्तर दिले होते.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news