World Television Day : देशात 22 कोटींपेक्षा जास्त टीव्ही संच

World Television Day : देशात 22 कोटींपेक्षा जास्त टीव्ही संच
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार भारतात 2022 मध्ये 22 कोटी 60 लाख टीव्ही संच होते. हा आकडा 2026 मध्ये 24.8 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. भारतात आज प्रसारित होणार्‍या टीव्ही चॅनेल्सची संख्या एक हजाराच्या घरात आहे. दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणजेच टेलिव्हिजन दिवस साजरा केला जातो. समाजावर परिणाम करणार्‍या महत्त्वाच्या समस्या आणि घटनांबद्दल नि:पक्षपाती माहिती प्रदान करण्यासाठी या माध्यमाच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  1. सुरुवातीला 20 इंची शटरचा मोठा टीव्ही होता. याचे वजन सुमारे 20 किलोपर्यंत असायचे.
  2. टीव्हीवरील प्रसारण बघण्यासाठी घरापासून 20 फूट उंचीवर अँटेना लावावे लागायचे.
  3. त्यानंतर 14 इंची पोर्टेबल टीव्ही बाजारात आला.
  4. हॉरिझेंटलचे आडवे आणि उभे मॉडेलचे टीव्ही आले, जे बूस्टर लावून बघितले जात असत.
  5. 1982 पासून कलर टीव्हीचे 14 इंची, 20 इंची, 24 इंची आणि 32 इंची जम्बो मॉडेल बाजारात आले. या टीव्हीचे वजन 22 ते 25 किलोपर्यंत असायचे.
  6. 1995 पासून प्लाझ्मा टीव्ही
  7. 1998 पासून एलसीडी टीव्ही
  8. 2005 पासून एलईडी टीव्ही
  9. 2012 पासून स्मार्ट टीव्ही

डीटीएच सबस्क्रायबर्स

'डायरेक्ट टू होम' म्हणजेच डीटूएच कनेक्शन घेणार्‍यांची संख्या देशात सप्टेंबर 2022 मध्ये 6.56 कोटी होती.

भारतात टीव्हीचा प्रवास..

  • 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्लीतून प्रायोगिक प्रसारणासह टीव्ही भारतात आला.
  • सुरुवातीला टेलिव्हिजन इंडिया असलेले नाव 1975 मध्ये बदलून दूरदर्शन झाले.
  • 80 च्या दशकापासून सामान्य लोकांमध्ये टीव्हीचा प्रसार झाल्याचे मानले जाते.
  • 25 एप्रिल 1982 पासून भारतात कलर टीव्ही आला. याचवर्षी पहिली राष्ट्रीय दूरदर्शन वाहिनी सुरू झाली.
  • 26 जानेवारी 1993 रोजी दूरदर्शनने मेट्रो चॅनल सुरू केले. पहिले डीडी-1 आणि दुसरे डीडी-2 चॅनल लोकप्रिय झाले.
  • यानंतर खासगी वाहिन्यांचा प्रवेश. आज भारतात प्रसारित होणार्‍या टीव्ही चॅनेल्सची संख्या एक हजाराच्या घरात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news