पुढारी ऑनलाईन डेस्क : आज वर्ल्ड टेलिव्हिजन डेनिमित्त कलाकारांनी त्यांच्या जुन्या गोड आठवणी शेअर केल्या आहेत. कलाकारांनी काय म्हटलंय पाहुया.
सोनी सबवरील मालिका 'मॅडम सर'मध्ये एसआय करिष्मा सिंगची भूमिका साकारणारी युक्ती कपूर म्हणाली – "आपण आपल्या जीवनात टेलिव्हिजनच्या उपस्थितीचे कौतुक करत नाही असा एकही दिवस नाही. बालपणापासून आजपर्यंत टेलिव्हिजन आपली व्याप्ती वाढवत आहे आणि सर्वसमावेशक कन्टेन्टच्या माध्यमातून जगाला एकत्र आणत आहे. महाभारत व रामायण यांसारख्या मालिका दाखवल्या जाणाऱ्या काळात इंडस्ट्रीने प्रेक्षकांच्या आवडीला साजेसे असे पुरोगामी व संबंधित कन्टेन्ट दाखवण्यामध्ये लांबचा पल्ला गाठला आहे. मी १२ वर्षांपासून टेलिव्हिजन क्षेत्रात काम करत आहे आणि अशा मोठ्या व लोकप्रिय व्यासपीठाचा भाग असण्याचा मला खूप आनंद होत आहे. वर्ल्ड टेलिव्हिजन डेनिमित्त मी आमच्यासाठी प्रत्येक दिवशी टीव्ही पाहण्याचा अद्भुत अनुभव देणाऱ्या सर्वांचे आभार मानते.''
सोनी सबवरील मालिका 'मॅडम सर'मध्ये एसएचओ हसीना मलिकची भूमिका साकारणारी गुल्की जोशी म्हणाली – "आपण सर्व आपल्या सुरूवातीच्या दिवसांपासून टेलिव्हिजन पाहत मोठे झालो आहोत. टेलिव्हिजन आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मला आजही आठवते की, मी शाळा सुटल्यावर धावत घरी जाऊन माझे आवडते कार्टून्स व टेलिव्हिजन मालिका पाहायचे. हे कलाकार विविध भूमिका कशाप्रकारे साकारायचे याबाबत उत्सुकता असायची. बालपणी मी अनेक करिअरचे स्वप्न पाहिले, जे दरवर्षी बदलायचे; पण कालांतराने मी पाहिलेल्या मालिकांचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला. मी काय करायचे व कुठे असले पाहिजे हे ठरवले. ते म्हणजे टेलिव्हिजन क्षेत्रात जाणे. आज मी या क्षेत्राचा भाग असल्याबद्दल कृतज्ञ आहे आणि मी माझ्या प्रवासाची आठवण म्हणून दरवर्षी वर्ल्ड टेलिव्हिजन डे साजरा करते.''
सोनी सबवरील मालिका 'मॅडम सर'मधील चिंगारी गँगची प्रमुख रचना परूळकर म्हणाली- " हे क्षेत्र मला दिवसभरातील थकव्यानंतर आराम देण्यास मदत करते किंवा अभिनेत्री म्हणून अधिक प्रगती करण्यास मदत करू शकणारे कन्टेन्ट यावर पाहता येतात. मला आठवते, बालपणी मी 'देख भाई देख'व 'तेनाली रामा'या मालिका पाहायचे. फक्त एवढेच नाही, मी कार्टून नेटवर्कवर सर्व कार्टून्स पाहण्याचा, एमटीव्ही व चॅनेल व्ही वर ९०च्या दशकातील गाणी ऐकण्याचा देखील आनंद घेतला. टेलिव्हिजनबाबत माझी गोड आठवण सांगायची झाली तर या व्यासपीठाच्या माध्यमातून झालेले माझे पदार्पण. मी या क्षेत्राचा भाग असण्याबद्दल कृतज्ञ आहे.''
सोनी सबवरील मालिका 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल'मध्ये टेलिव्हिजनच्या पहिल्या सिमसिमची भूमिका साकारणारी सयंतनी घोष म्हणाली- "मला आठवते, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य रविवारी सकाळी एकत्र येऊन महाभारत पाहायचे. कॉलनीतील सर्वजण ही मालिका पाहत असल्यामुळे संपूर्ण कॉलनी शांत असायची. बालपणीची ही माझी सर्वात गोड आठवण आहे, जी सदैव माझ्या स्मरणात राहिल. माझ्या मनाला स्पर्श केलेली माझी आवडती मालिका होती 'आय ड्रीम ऑफ जेनी'. मनोरंजनासोबत या मालिकेचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आणि माझ्या जीवनाला कायमस्वरूपी कलाटणी मिळाली. मला सांगावेसे वाटते की, या मालिकेने अभिनेत्री बनण्याच्या माझ्या निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मालिकेने मला विश्वास दिला की मी देखील माझी स्वप्ने व दृष्टिकोनांना वास्तविकतेत आणू शकते. मी ऑडिशन देण्यास, गिग्स करण्यास, अथक मेहनत घेण्यास सुरूवात केली आणि अखेर माझे स्वप्न साकारले. प्रेक्षक म्हणून टेलिव्हिजन मालिका पाहण्याचा आनंद ते त्यामध्ये काम करण्यापर्यंत टेलिव्हिजनने माझ्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कलाकारांसाठी टेलिव्हिजन हे देशाच्या कानाकोपऱ्यामधील प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याचे माध्यम आहे.''
सोनी सबवरील लोकप्रिय मालिका 'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्से'मधील सुमीत राघवन म्हणाले-
"टेलिव्हिजनवरील माझ्या करिअरदरम्यान अनेक स्पेशल आठवणी आहेत. मी मराठी मालिका 'फास्टर फेणे'मध्ये बाल कलाकार म्हणून माझ्या पहिल्याच भूमिकेसह करिअरला सुरूवात केली. आणखी एक म्हणजे मी 'महाभारत'मध्ये सुदामाची भूमिका देखील साकारली आहे. आम्हाला रात्रीच्या वेळी पावसामध्ये सीनचे शूटिंग करायचे होते. मला एका झाडावर माझे संवाद बोलायचे होते. त्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागले, कारण मी थंडीने थरथरत होतो. त्यावेळी रवी चोप्रा शिडीवरून माझ्यासाठी चहाचा कप घेऊन आले आणि म्हणाले 'सुमीत चहा घे, तुला उबदार वाटेल'. मी त्यांचा दयाळूपणा पाहून भारावून गेलो. आणखी एक संस्मरणीय क्षण म्हणजे मला सतीश शाहसोबत काम करण्याची संधी मिळाली. ते मोठे सेलिब्रिटी आहेत, ज्यामुळे माझ्यासाठी ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. यासारख्या माझ्या अनेक प्रकल्पांनी आणि मी काम केलेल्या मालिकांनी करिअर म्हणून टेलिव्हिजन क्षेत्रात अभिनय स्वीकारण्यामध्ये मला खूप मदत केली आहे.''
सोनी सबवरील मालिका 'पुष्पा इम्पॉसिबल'मधील लोकप्रिय पुष्पा म्हणाली, "रामायण व महाभारत यांसारख्या अनेक मालिका माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत. या मालिका माझ्या बालपणीच्या महत्त्वपूर्ण भाग होत्या, कारण मला या मालिकांमधून नैतिक मूल्यांची शिकवण मिळण्यासोबत काटेकोरपणे त्यांचे पालन करण्यास प्रेरणा देखील मिळाली. तसेच मी किेशोरवयीन वयात 'हम लोग', 'कशिश', 'खाली हाथ', 'मिर्झा गालिब' अशा मालिका देखील पाहिल्या, ज्यांचा अभिनयमध्ये करिअर घडवण्यासाठी माझ्यावर मोठा प्रभाव पडला. कलाकार म्हणून आदर्श व्यक्तींबाबत काही पात्रं आहेत, जसे मालिका 'मिर्झा गालिब'मधील नीना गुप्ता आणि टेलिव्हिजन मालिका 'रजनी'मधील पात्रांनी एक उत्तम कलाकार बनण्यास मला प्रेरित केले. माझा विश्वास आहे की, माझी भूमिका पुष्पा अगदी रजनीसारखीच आहे, ज्यामधून मला खूप आनंद व समाधान मिळते.''
हेही वाचा :