जागतिक मूळव्याध दिनविशेष : अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘डीसीआर’ मासिकात मूळव्याधीवरील ‘चिवटे सर्जरी’ला मानाचे स्थान!

जागतिक मूळव्याध दिनविशेष : अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ‘डीसीआर’ मासिकात मूळव्याधीवरील ‘चिवटे सर्जरी’ला मानाचे स्थान!
Published on
Updated on

चंद्रपूर; राजेश्वर येरणे : मूळव्याध म्हणजे अवघड जागेचे नाजूक दुखणे! ज्याला हा रोग होतो तो ते पाहू शकत नाही अन् इतरांनाही तो दाखवू शकत नाही. मूळव्याध म्हणजे मनाची प्रचंड घालमेल अन् तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यासारखी बिकट स्थिती. अशा अवघड जागेवरील बिकट रोगावर सहज आणि सोपी शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील ठाण्याच्या एका कल्पक डॉक्टरने शोधून काढली आहे. या डॉक्टरचे नाव आहे शांतिकुमार चिवटे. 'चिवटेज् प्रोसिजर फॉर पाईल्स' या नावाने मूळव्याधीवरील शस्त्रक्रियेचे हे नवसंशोधन ओळखले जात असून, अमेरिकेतील 'डीसीआर' अर्थात 'डिसिजेस ऑफ कोलोन अँड रेक्टम' या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

'चिवटेज् प्रोसिजर फॉर पाईल्स' ही सर्जरी आता जगभर वापरली जात आहे. मूळव्याधीच्या कोंबाचा गुच्छ न कापता रुग्णाला कायम व्याधीमुक्त करणार्‍या वेदनारहित शस्त्रक्रिया संशोधनाची नोंद अमेरिकेतील जागतिक मासिकाने घेतली आहे. या नवसंशोधित शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा ही शस्त्रक्रिया केली, तर उर्वरित आयुष्यभर पुन्हा कधीच मूळव्याध होत नाही. दुसरे वैशिष्ट्य हे की, शस्त्रक्रियेनंतर 48 तासांत रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. कमी खर्चात ऑपरेशन ही रुग्णाला दिलासा देणारी बाब ठरली आहे.

डॉ. शांतिकुमार चिवटे हे जनरल सर्जन, कर्करोगावरील शस्त्रक्रिया करताना त्यांच्या संशोधक नजरेने प्रोक्टोलॉजी विषयात जगप्रसिद्ध मासिकात हे उपयुक्त नवसंशोधन नोंदवून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. चिवटे यांच्या संशोधनाला बळ मिळावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ग्रामीण भागातील आणखी एका डॉक्टरने अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांचे नाव आहे डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर. 'चिवटेज् प्रोसिजर फॉर पाईल्स' शस्त्रक्रिया संशोधन 'लॉजिकल एंड'ला नेण्यासाठी गेली 10 वर्षे ते कार्यरत आहेत. एका दशकाच्या प्रवासात त्यांनी 1 हजार 800 नवसंशोधित शस्त्रक्रिया केल्या आहेत. या जगातील सर्वाधिक शस्त्रक्रिया आहेत.

हा महाराष्ट्राचा गौरव!

डॉ. शांतिकुमार चिवटे यांनी शोधून काढलेली वेदनारहित आणि स्वस्त मूळव्याध शस्त्रक्रिया संशोधनपद्धती आज जागतिकस्तरावर गेली आहे. हा महाराष्ट्राचा गौरव आहे.
डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर,जनरल सर्जन, ब्रह्मपुरी

मूळव्याध होण्याची महत्त्वाची कारणे…

चयापचय संस्थेमध्ये होणारी गुंतागुंत, आपल्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयीमुळे, व्यायामाचा अभाव, मसाल्याचे, तिखट, वारंवार मसालायुक्त मांसाहार आणि त्यामुळे होणारे अपचन, अतिजागरण, बैठी जीवनशैली, अतिमद्यपान आणि बराचवेळ शौचालयात बसून राहणे…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news