World Down Syndrome Day : डाऊन सिंड्रोम रुग्ण म्हणजे वेडा नव्हे, गैरसमज नको!

World Down Syndrome Day : डाऊन सिंड्रोम रुग्ण म्हणजे वेडा नव्हे, गैरसमज नको!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डाऊन सिंड्रोमने ग्रस्त (World Down Syndrome Day) मुलांविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. परंतु हे रुग्ण नाही तर विशेष मुले आहेत. इतरांप्रमाणेच हसणे-खेळणे त्यांनाही आवडते. प्रशिक्षणाने अशी मुलेही खूप काही शिकू शकतात. इतकेच नव्हे तर पालक, डॉक्टर आणि समाजाच्या साथीने उपचार मिळाले तर स्वालंबी जीवन जगू शकतात. असे बालरोग तज्त्र डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले.

जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस (World Down Syndrome Day) दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. यावर्षीची एन्ड द स्टिरिओटाइप असून, याचा उद्देश डाउन्स रुग्णांबद्दल लोकांना गैरसमज आणि पूर्वग्रहांमुळे भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरुकता वाढवणे आहे. बौध्दीक विकलांग व्यक्तींकडे फक्त सहानुभूतीच्या नजरेतून न बघता त्यांना योग्य वागणूक मिळवून देणे आणि इतरांसारख्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, डाउन्स रुग्णांबद्दल अनेक गैरसमज असल्याने त्यांच्या स्वालंबी होण्यामध्ये मोठे अडसर ठरत आहे. हे गैरसमज दूर होणे आवश्यक असून, यासाठी यंदा प्रयत्न केले जाणार आहेत.

डाऊन सिंड्रोम म्हणजे काय?

वयाची ३५ वर्ष ओलांडल्यानंतर महिला पहिल्यांदा गरोदर राहिल्यास म्हणजेच आईच्या वाढत्या वयाबरोबर डाउन्स सिंड्रोमचे (Down Syndrome) प्रमाण वाढते. सध्या ७०० पैकी एका बाळांमध्ये २१ नंबरच्या गुणसूत्र दोन ऐवजी तीन जोड्या निर्माण झाल्यामुळे डाउन्स सिंड्रोमचे बाळ जन्माला येते.

काय आहेत लक्षणे

कमी उंची, थोडे गतिमंद यासह गोल चेहरा, मागून चपटे डोके, विशिष्ट प्रकारचे आडवे डोळे, चपटे नाक, छोटे हात, पायाची व हाताची विशिष्ट प्रकाराची ठेवण, चिडचिडेपणा अशी लक्षणे बघूनच डाउन्स सिंड्रोमचे (Down Syndrome) निदान होते. या आजारासोबतच जन्मजात हृदयाच्या व्याधी, आतड्याच्या व्याधी मानेच्या हाडाची कमजोरी असते. दरम्यान, गरोदर स्त्रियांमध्ये १४ ते १६ आठवड्यादरम्यान तपासण्या केल्यास डाउन्स सिंड्रोमचे निदान होऊ शकते. १८ ते २० आठवड्यात सोनोग्राफीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून निदान होऊ शकते.

उपचाराने चांगले आयुष्य

डाउन्स सिंड्रोमला (Down Syndrome) जोडून येणाऱ्या आजारांवर उपचार हा महत्त्वाचा भाग असतो. फिजिओथेरपीच्या सहाय्याने स्नायुची लवचिकता कमी करुन मुलांना काम शिकवले जाऊ शकते. प्रशिक्षित करुन आपल्या पायावर उभे राहून चांगले आयुष्य दिले जाऊ शकते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news