World Chess Championship 2023 : कार्सलनला झुंजवणाऱ्या प्रज्ञानंदविषयी जाणून घ्या सविस्तर…

World Chess Championship 2023 : कार्सलनला झुंजवणाऱ्या प्रज्ञानंदविषयी जाणून घ्या सविस्तर…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या १८ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दिलेली झूंज तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरली आहे. अवघ्‍या १८ वर्षांच्‍या आर प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अग्र मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याला अटीतटीची लढत दिली. भारताच्‍या या युवा बुद्धिबळपटूने आपल्‍या उज्‍ज्‍वल भवितव्‍याची ग्‍वाहीच दिली. जाणून घेवूया आर. प्रज्ञानंदच्‍या आजवरच्‍या प्रवासाविषयी…

FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना तिसर्‍या दिवसापर्यंत रंगला हाेता. पहिले दाेन दिवसातील डाव बराेबरीत सुटला हाेता. भारतासाठी आजचा दिवस निर्णायक हाेता. अंतिम सामन्‍यात आर. प्रज्ञानंद सुरुवातीच्‍या डावात आघाडीत घेत आपले वर्चस्‍व दाखवून दिले होते. मात्र अखेर अंतिम क्षणी कार्लसनचा अनुभव कामी आला आणि प्रज्ञानंद चॅम्पियनशिपला मुकला.   (World Chess Championship)

'WCC' फायनलपर्यंत धडक मारणारा देशातील दुसरा बुद्धिबळपटू

FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप स्‍पर्धेतील उपांत्य फेरीत आर. प्रज्ञानंद याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा पराभव केला होता. यानंतर त्‍याच्‍याकडून अपेक्षा वाढल्‍या. तब्‍बल २२ वर्षानंतर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणारा तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला होता. यापूर्वी विश्‍वानाथ आनंद याने २००० आणि २००२ मध्‍ये या स्‍पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली होती. दोन्‍हीवेळा त्यांनी फिडे वर्ल्डकपचा किताबावर आपली मोहरी उमटवली होती. (World Chess Championship)

तिसर्‍या वर्षापासून लागली बुद्धिबळ खेळाची गोडी

प्रज्ञानंदचा जन्म १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथे झाला. वयाच्या तिसर्‍या वर्षापासून त्‍याला बुद्धिबळ खेळाची गोडी लागली. त्‍याचे वडील रमेशबाबू बँकेत नोकरी करतात. त्‍यांना पोलिओची लागण होऊनही त्यांनी हिंमत न हारता मुलांचे उत्तम संगोपन केले. प्रज्ञानंद याची मोठी बहीण वैशाली ही बुद्धिबळ खेळते. तिच्‍याकडून प्रज्ञानंदने या खेळाचे प्राथमिक धडे गिरवले. वैशालीची इच्छा होती की, प्रज्ञानंदने टीव्हीवर कमी कार्टून पाहावीत. या कारणास्तव, तिने आपल्या लहान भावाला बुद्धिबळाच्या युक्त्या शिकवल्या. तेव्हा आपला भाऊ बुद्धिबळात चमत्कार करेल, असे तिला वाटलं नव्‍हतं.

आईची खंबीर साथ

प्रज्ञानंदच्या यशात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. लहानपणापासूनच विविध बुद्धिबळ स्‍पर्धेत त्‍याच्‍यासोबत आईच जात असे. मुलगी वैशाली आणि मुलगा प्रज्ञानंद यांना बुद्धिबळात विशेष प्राविण्‍य मिळविण्‍यासाठी तिची प्रेरणा महत्त्‍वपूर्ण ठरली. आपल्‍या दोन्‍ही मुलांना साथ देण्‍यासाठी ती नेहमी तत्पर असते.

प्रज्ञानंदने  १२व्या वर्षी ग्रँडमास्टर

२०१८ हे वर्ष प्रज्ञानंदसाठी खास होते. वयाच्या १२व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला. देशातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्‍याचा बहुमान त्‍याच्‍या नावावर आहे. विश्वनाथन आनंद यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टर बनले होते. तर प्रज्ञानंद जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. याबाबतीत युक्रेनचा सर्जी क्राजाकिन त्याच्या पुढे आहे. १९९० मध्ये वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी तो ग्रँडमास्टर बनला होता.

बुध्दिबळासह क्रिकेटची आवड

बुद्धिबळ खेळाव्यतिरिक्त प्रज्ञानंद याला क्रिकेटचीही आवड आहे. संधी मिळेल तेव्हा तो क्रिकेट सामने खेळायलाही जातो. बुद्धिबळात करिअर केल्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर त्याला कोणतेही यश मिळाले नसले तरी त्याला क्रिकेट खेळण्याची आणि सामने पाहण्याची आवड आहे.

आर. प्रज्ञानंदचे रँकिंग

२०१३ साली वयाच्या आठव्या वर्षी प्रज्ञानंदने जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली होती. तो सात वर्षांचा असताना त्याला FIDE मास्टर पदवी मिळवली. त्याशिवाय, वयाच्या दहा वर्षे, दहा महिने आणि एकोणीस दिवसात, २०१५ मध्ये १० वर्षांखालील विजेतेपद पटकावल्यानंतर प्रग्गानंदाने इतिहासातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू बनला.

२०१७ साली प्रज्ञानंदने वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप जिंकत ग्रँडमास्टर बनला. त्याने १७ एप्रिल २०१८ रोजी ग्रीसमधील हेराक्लिओन फिशर मेमोरियल जीएम नॉर्म स्पर्धेत बुद्धिबळात त्याचा दुसऱ्यांदा ग्रँडमास्टर बनला.

२३ जून २०१८ रोजी इटलीतील उर्तिजी येथे झालेल्या ग्रेडाइन ओपनमध्ये, प्रज्ञानंदने तिसरे ग्रँडमास्टर विजेतेपद जिंकले. यावेळी त्याचे वय १२ वर्षे, १० महिने होते. याव्यतिरिक्त, विजेतेपदाचा दुसरा सर्वात तरुण विजेता होता. १२ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रज्ञानंदने जागतिक युवा चॅम्पियनशिपच्या १८ वर्षांखालील विभागात प्रथम क्रमांक पटकावला.

प्रज्ञानंदच्या नावावर इतकी संपत्ती

एका मीडिया वेबसाइटवरने दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञानंदची संपत्ती सुमारे $1.00 दशलक्ष म्हणजेच ८३ लाख रूपये इतकी आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news