
शिरूर; पुढारी वृत्तसेवा : सध्या दैनंदिन वस्तू खरेदीसाठी यूपीआय पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. या अॅपला स्कॅनरची गरज असते. सध्या दुकानांमधील स्कॅनर प्लॅस्टिकमध्ये बसवलेले असते. ते लवकर खराब होत असल्याने शिरूरमधील अवलियाने लाकडी स्कॅनर बनवले आहे. दिग्विजय मोरबाळे असे त्या अवलियाचे नाव आहे. सध्या प्रत्येक दुकानात प्लास्टिक स्कॅनर बसवलेले असते. मात्र, वारंवार कसेही वापरून ते लवकर खराब होते.
हे पाहून दिग्विजय यांच्या मनात याच स्कॅनरला लाकडात बनवून त्याच्यावर दुकानाचे नाव, लोगो, बारकोड, मोबाईल नंबर आणि इमेल आयडी कोरीव काम करून बसवायचा विचार आला. डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी बारकोडचे डिझाईन बनवायला सुरुवात केली. बारकोडची डिझाईन खूप नाजूक, वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे खूप अडचणी आल्या. पण जिद्द न हरता सर्व अडचणीवर मात करून, त्यांनी लाकडी स्कॅनर बनवला. ज्यावेळी तो मोबाईलमध्ये स्कॅन व्हायला लागला, त्या वेळी त्यांना खूप आनंद झाला.
अथक परिश्रमातून दीपांजली वुड आर्ट नावाचा पहिला लाकडी स्कॅनर जानेवारी 2022 मध्ये बनवला. त्यानंतर शिरूरमधील लाकडी वस्तूंच्या प्रदर्शनात तो विक्रीसाठी ठेवला. प्रदर्शनात लोकांनाही तो आवडला. शिरूरमधील काही जुन्या हॉटेलची ऑर्डर मिळाली. तेथेही हे स्कॅनर ग्राहकांना आवडले. मागणी वाढून आतापर्यंत जवळपास सत्तर लाकडी स्कॅनर बनवून दिल्याचे मोरबाळे सांगतात.
लाकडी स्कॅनरची वैशिष्ट्ये