Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर घडणार ‘महिलाराज’चे दर्शन

Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर घडणार ‘महिलाराज’चे दर्शन
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्‍यपथावर होणारी परेड आपल्या देशाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवते. मागील काही वर्षे या परेडमध्ये महिला लष्करी अधिकारीही सन्मानाने सहभागी होत आहेत तसेच नेतृत्वही करत आहेत. मात्र आता पुढील वर्षी म्‍हणजे २०२४ मध्‍ये (Republic Day Parade) प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर हाेणार्‍या परेडमध्‍ये केवळ महिलाच सहभागी होणार असून, यानिमित्त संपूर्ण जगाला भारतातील 'महिलाराज'चे दर्शन होणार आहे.

२६ जानेवारी २०२४ रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर केवळ महिलांचा समावेश केला जाईल. परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसतील. संरक्षण मंत्रालयाने लष्करी दल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. (Republic Day Parade 2024)

गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. गेल्या महिन्यात २९ एप्रिल रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

७ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत निर्णय

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या 'डी-ब्रीफिंग बैठकीत' घेण्यात आला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लष्कर, नौदल, हवाई दल, गृह मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन परेड २०२४ मधील कर्तव्याच्या मार्गावरील परेड दरम्यानच्या तुकडी (मार्चिंग आणि बँड), टॅबलेक्स आणि इतर प्रदर्शनांमध्ये फक्त महिला सहभागी असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. मार्चमध्ये संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात पत्रही पाठवले होते.

2023 च्या परेडमध्ये नारी शक्ती ही थीम होती

२६ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांच्या पथ प्रदर्शनामध्ये 'महिला शक्ती' ही मुख्य थीम ठेवली होती. यावेळी नौदलाच्या १४४ खलाशांच्या तुकडीचे प्रदर्शन लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. ३ महिला आणि ६ पुरुष अग्निवीर प्रथमच ड्युटी मार्गावर दिसले.

परेडमध्‍ये महिलांचा सहभाग

२०१५ : लष्कर, हवाई दल आणि नौदलातील महिलांनी प्रथमच परेडमध्‍ये आपला सहभाग नाेंदवला.
२०१९ : आर्मी डेअरडेव्हिल्स संघाच्‍या कॅप्टन शिखा सुरभी बाइक स्टंट करणारी पहिल्‍या महिला अधिकारी ठरल्‍या.
२०२० : कॅप्टन तानिया शेरगिल पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिल्‍या महिला अधिकारी ठरल्‍या.
२०२१ : फ्लाइट लेफ्टनंट भावना कंथ या परेडमध्ये सहभागी होणारी पहिल्‍या महिला लढाऊ वैमानिक ठरल्‍या.
२०२३ : लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्या नेतृत्वाखाली नौदल दलाच्या १४४ खलाशांचे नेतृत्व करण्यात आले.
२०२३ : प्रथमच ५ महिला लष्कराच्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये सामील झाल्या.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news