महिला दिन विशेष : ६४% भारतीय महिलांचे वर्क फ्रॉम ऑफिसला प्राधान्य, मिलेनियल महिलांचा वाढता कल रिमोट वर्कला

महिला दिन विशेष : ६४% भारतीय महिलांचे वर्क फ्रॉम ऑफिसला प्राधान्य, मिलेनियल महिलांचा वाढता कल रिमोट वर्कला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात ६४ टक्के महिला कर्मचारी वर्क फ्रॉम ऑफिस प्रकारे काम करतात, तर २१.८ टक्के महिला हायब्रिड आणि १३.५ टक्के महिला कर्मचारी रिमोट किंवा वर्क फ्रॉम होम प्रकारे काम करतात. लिंक्डइनने महिला दिनानिमित्त ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. पण मिलेनियल महिलांचा वाढता कल हा रिमोट वर्कसाठी असल्याचे या अहवालातून दिसते.

ज्यांचा जन्म १९८१ ते १९९६ या काळात झाला आहे, त्यांना मिलेनियल जनरेशन म्हटले जाते, यालाच जनरेशन वाय (Y) असेही नाव आहे. तर १९९७ ते २०१२मध्ये जन्मलेल्या पिढीला जनरेशन Z असे मह्टले जाते.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटवर असलेल्या आकडेवारीनुसार भारतातील ४४ टक्के कंपन्यानी कामासाठी आता हायब्रीड कार्यपद्धती स्वीकारली आहे. तर १० टक्के कंपन्या रिमोट पद्धतीने काम करतात. असे जरी असले तरी रिमोट प्रकारे काम करण्याला मिलेनियल महिलांची (१४.४ टक्के) वाढती पसंती आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

ज्या मिलेनियल महिला आहेत, त्यांना वर्क लाईफ बॅलन्स सांभाळायचा असतो, आणि त्यांना अधिक लवचिकता हवी असते, त्यामुळे या महिलांचा कल रिमोट प्रकारच्या कामांकडे जास्त आहे, असे ऋतुपर्ण चक्राब्रोती यांनी म्हटले आहे. ऋतुपर्ण या टीमलिस सर्व्हिस या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत.

तर विशेष म्हणजे जनरेशन झेड (Z) मधील महिलांनी मात्र वर्क फ्रॉम ऑफिस म्हणजेच ऑनसाईट सेटिंगला प्राधान्य दिले आहे. ऑनसाईट प्रकारे काम करणाऱ्या महिलांत ६९ टक्के वाटा हा जनरेशन Zचा आहे. याचे कारण म्हणजे जनरेशन Z मधील महिलांनी नुकतेच करिअरला सुरुवात केलेली आहे, त्यांच्यासाठी नेटवर्किंग, ऑफिसमध्ये जाऊन शिकणे, सामाजिक संवाद या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news