मुबंई; पुढारी ऑलनाईन : ऑस्करमधील 'थप्पड प्रकरण' कोण विसरू शकेल? ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता विल स्मिथला (will smith) त्याच्या पत्नीची चेष्टा सहन न झाल्याने त्याने सुत्रसंचालक ख्रिस रॉकला थप्पड मारली होती. ही बातमी जगभर चर्चेत होती. माध्यमातील वृत्तानुसार, या थप्पड प्रकरणामुळे विल स्मिथ आपल्या पत्नीपासून दूर गेला आहे आणि लवकरच दोघांमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे थप्पड प्रकरण अद्याप विल स्मिथची पाठ सोडत नसल्याचेच दिसत आहे.
थप्पड प्रकरणामुळे जॅडा पिंकेट आणि विल स्मिथशी (will smith) एकमेकांशी बोलत नसल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीमध्ये रंगली आहे. दोघांमध्ये क्वचितच संभाषण होते. द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, दोघेही एका घरात राहतात पण त्यांच्यातील संवाद बंद आहे. दोघांमध्ये बराच तणाव निर्माण झाला आहे. हे प्रकरण लवकरच घटस्फोटासाठी न्यायालयात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांचा घटस्फोट चर्चेत होता. यानंतर आता विल स्मिथ आणि जॅडा पिंकेटच्या घटस्फोटाचे प्रकरण गाजू शकते.
याआधी सुद्धा जॅडा पिंकेट स्मिथपासून विभक्त झाली होती (will smith)
याआधीही जॅडा पिकेंट विल स्मिथ पासून वेगळी झाली होती. लग्नानंतर पिंकेटचे दुसऱ्या व्यक्तीशी अफेअर सुरु होते. पण नंतर तिला समजले की स्मिथशिवाय आपण राहू शकणार नाही आणि ती पुन्हा स्मिथकडे परत आली.
घटस्फोटामुळे स्मिथचे होणार मोठे नुकसान (will smith)
एका इंटरनॅशनल मॅगझिननुसार, ऑस्करमध्ये झालेल्या थप्पड प्रकरणामुळे या जोडप्यामधील तणाव खूप वाढला आहे. मात्र, याआधी देखिल त्यांच्यात सर्व काही ठीक नव्हते. मात्र आता परिस्थिती अधिकच बिघडली आहे. जर दोघे वेगळे झाले तर स्मिथला सर्वात जास्त त्रास होणार आहे. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार घटस्फोट झाल्यास पतीला त्याच्या संपत्तीपैकी निम्मी रक्कम पत्नीला द्यावी लागते.
जॅडा पिंकेटला विल स्मिथशी लग्न करायचे नव्हते (will smith)
ऑस्करमध्ये घडलेल्या थप्पड प्रकरणानंतर विल स्मिथ आणि जॅडा पिंकेटची जुनी मुलाखत पुन्हा एकदा व्हायरल झाली होती. या मुलाखतीमध्ये लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर जॅडा रडायला लागली आणि ती म्हणाली की मला विल स्मिथशी लग्न करायचे नव्हते. ती पुढे म्हणाली, तेव्हा मी अत्यंत दबावाखाली होते. तेव्हा मी एक युवा अभिनेत्री होते आणि मी गरोदर होते. तेव्हा मला कळत नव्हते की, मी काय करावं पण मला लग्न करायचे नव्हते.
जॅडा गरोदर असल्याने विल स्मिथने केले लग्न
याच कार्यक्रमात जॅडा पिंकेटने आपल्याला लग्न करायचे नव्हते आणि मी गरोदर होते असे विधान केल्यानंतर या विषयी विल स्मिथला विचारण्यात आले. विल स्मिथने या गोष्टीला चेष्टेत घेत त्याने सुद्धा, हो जॅडा गरोदर राहिल्याने आम्ही लग्न केलं अशी कबुली दिली.