शिवसेनेच्या महाअधिवेशनासाठी मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांसाठी कोल्हापुरात आले आहेत. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार पूर्ण सकारात्मक आहे. पहिल्या दिवसापासून सरकाची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देत असताना, ओबीसी समाजावर तसेच अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काल होती, आज आहे, कायम आहे.