मनसेच्या हातातील स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाख बक्षीस देईन : राज ठाकरे

Raj Thackeray
Raj Thackeray

पुढारी ऑनलाईन : आज पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा  पार पडला. राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. तब्येत बरी नसतानाही केवळ या भेटीसाठी पुण्याला आल्याच सांगितलं. तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी आगामी काळात  जबाबदारीने काम करावं हे देखील त्यांनी नमूद केलं. या भाषणात त्यांनी स्वच्छतेच्या मुद्याकडे जास्त लक्ष देण्याविषयी सांगितले. स्वच्छतेसाठी इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायतीचा उल्लेख ! 

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राज यांनी आपल्या मिश्किल अंदाजात लहानपणी पाहिलेल्या सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायतीचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी शोले सिनेमातील रामगढ ग्रामपंचायतीचा उल्लेख केला. त्यावेळी त्या गावात घरात लाइट नाही पण गावात पाण्याची टाकी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

बक्षीस मिळणार.. 

राज यांनी सर्वाधिक स्वच्छ ग्रामपंचायतीसाठी निधीही जाहीर केला आहे. ते म्हणाले 'मनसेच्या हातातील स्वच्छ ग्रामपंचायतीला मी स्वत: पाच लाखांचे बक्षीस देईन'असं राज यांनी यावेळी म्हटलं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news