पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने WFI ची नवीन कार्यकारिणी तसेच भारतीय कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित केले आहे. या निर्णयानंतर ब्रिजभूषण शरण सिंग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. Brij Bhushan Sharan Singh
दरम्यान, भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या सर्व निर्णयांना सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता संजय सिंह अध्यक्ष राहणार नाहीत. अलीकडेच WFI निवडणुकीत विजयी झालेले संजय सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकची निवृत्ती आणि बजरंग पुनियाचा पद्मश्री पुरस्कार मागे घेतल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. Brij Bhushan Sharan Singh
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघटनेचे आगामी सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नवीन कुस्ती संघटनेच्या कार्यकारिणीने नियमांविरुद्ध आगामी स्पर्धा आणि कार्यक्रम जाहीर केले होते. ज्यामध्ये नंदिनी नगर, गोंडा येथे अंडर-15 आणि अंडर-20 राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी प्रश्न उपस्थित केले होते. यापुढे डब्ल्यूएफआयची नवीन कार्यकारिणी कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या कारवाईवर बजरंग पुनियाने, मला अद्याप याबद्दल माहिती नाही. जर हा निर्णय घेतला असेल तर तो योग्यच आल्याचे त्याने म्हटले आहे.
हेही वाचा