अनिल देशमुख यांना जामीन मिळणार?; जामीन न मिळण्यासाठी ईडीचे न्यायालयात ५६ पानी प्रतिज्ञापत्र

अनिल देशमुख यांना जामीन मिळणार?; जामीन न मिळण्यासाठी ईडीचे न्यायालयात ५६ पानी प्रतिज्ञापत्र
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मागच्या कित्येक दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत आहेत. दरम्यान त्यांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. परंतु ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला आहे. अनिल देशमुखच या सगळ्यापाठीमागचे मास्टर माईंड असल्याचे ईडीने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र म्हटले आहे.

न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या न्यायालयापुढे अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे. १०० कोटींची वसूली, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर प्रभाव टाकल्याचा आरोपही ईडीकडून करण्यात आला आहे. पदाचा दुरुपयोग करून देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केल्याचा दावाही ईडीने केला आहे.

ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीने ईडी वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल ५६ पानांचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले आहे. देशमुख हेच या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.

पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्‍यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकल्याचंही यात म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. देशमुख हे एक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना जामीन देऊ नये, असेही ईडीकडून या पत्रात लिहण्यात आले आहे.

याशिवाय देशमुखांपेक्षाही वयानं मोठे असलेले अनेक आरोपी जेलमध्ये आहेत, त्यामुळे वाढत्या वयाचा दाखला देऊन जामीन मागणे चुकीचे असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news