वन्यप्राण्यांना सिंहाच्या गर्जनेपेक्षाही माणसाच्या आवाजाचीच भीती!

वन्यप्राण्यांना सिंहाच्या गर्जनेपेक्षाही माणसाच्या आवाजाचीच भीती!

जोहान्सबर्ग : वन्यप्राण्यांना सिंहाच्या गर्जनेपेक्षाही मानवी आवाजांची अधिक भीती वाटते, असे दक्षिण आफ्रि केत करण्यात आलेल्या एका पाहणीतून दिसून आले आहे. संशोधकांनी क्रुगर नॅशनल पार्कमध्ये पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी काही जंगली सस्तन प्राणी आलेले असताना तिथे स्पीकरवरून माणसांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. त्यावेळी 95 टक्के प्राणी अतिशय घाबरले व त्यांनी तत्काळ तेथून पळ काढला. याउलट सिंहाच्या गर्जनेचे आवाज त्यांना तितके भीतीदायक वाटले नसल्याचेही आढळून आले.

दक्षिण आफ्रि केत सहसा बोलल्या जाणार्‍या स्थानिक भाषेतील लोकांचे काही संवाद रेकॉर्ड करण्यात आले होते. हे रेकॉर्डिंग्ज क्रुगर नॅशनल पार्कमध्ये वाजवण्यात आले. त्यावेळी अँटीलोप हरणे, हत्ती, जिराफ, बिबटे, झेब—ा आदी अनेक प्राण्यांमध्ये घबराट दिसून आली. माणसाच्या संपर्कात राहणे धोकादायक असल्याचे प्राण्यांना वाटत, असे प्रकर्षाने दिसून आले.

याचे कारण म्हणजे माणसाकडून वन्यप्राण्यांची केली जाणारी शिकार, बंदुकीचा आणि शिकारी कुत्र्यांच्या वापर हे आहे. जंगलात कोणत्याही शिकारी प्राण्याच्या तुलनेत त्यांना माणसाचीच अधिक भीती वाटते. हे केवळ क्रुगर नॅशनल पार्कपुरतेच मर्यादित नसून ते जगभरातील वन्यप्राण्यांना लागू पडू शकते, असे संशोधकांना वाटते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news