igloo : बर्फापासून बनवलेले ‘इग्लू’ का असते ऊबदार?

बर्फापासून बनवलेले ‘इग्लू’ का असते ऊबदार?
बर्फापासून बनवलेले ‘इग्लू’ का असते ऊबदार?

लंडन : बर्फाळ प्रदेशात राहणारे एस्किमो लोक 'इग्लू' igloo नावाचे बर्फाचे घर बनवत असतात. बर्फापासूनच हे घर बनवलेले असले तरी ते आतून ऊबदार असते. एखाद्या डोमसारख्या या गोलाकार घरात ही माणसं कशी राहतात याचे आपल्याला आश्चर्य वाटत असते. बाहेर हाडे गोठवणारी थंडी असली तरी बर्फाच्या लाद्यांपासून बनवलेल्या या घरातील हवा ऊबदार असते. मात्र यामागेही एक विज्ञान आहे.

इग्लू igloo हे आपण पाहतो तशा बर्फाच्या लादीपासून बनवलेले नसतात. ते 'कॉम्प्रेस्ड स्नो' म्हणजेच हिमकणांपासून बनवलेले असतात. असा बर्फ किंवा हिम हे एक चांगले 'इन्सुलेटर' असते. या विद्युतरोधक बर्फामध्ये 95 टक्के हवा कोंडलेली असते. त्यामुळे त्याच्यामधून कोणताही प्रवाह वाहू शकत नाही. अशा वेळी घरातील लोकांच्या शरीराची उष्णता किंवा मेणबत्तीची उष्णताही आतच कोंडून राहते.

बर्फापासून बनवलेले इग्लू किती उष्ण राहू शकतात हे पाहणेही रंजक आहे. जर आपल्याला वाटत असेल की उणे 40 अंश सेल्सिअस तापमानात बनवलेले इग्लू अकरा-बारा अंश सेल्सिअस तापमान देऊ शकतात, तर ते चुकीचे आहे. ते केवळ उणे 40 अंश सेल्सिअस तापमानाला शून्यापर्यंत आणू शकतात. मात्र आत बाहेरची थंड हवा येत नाही तसेच आतील उष्णता आतच राहात असल्याने ती दिलासादायक गोष्ट बनते. उणे 40 अंश सेल्सिअस तापमानात शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ शकतात; पण शून्य अंश सेल्सिअस तापमानात तितका धोका राहात नाही. कॅनडाच्या सेंट्रल आर्क्टिक तसेच ग्रीनलँडच्या कानाक परिसरात असे इग्लू पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news