Lok Sabha Election 2024 | लोकसभेत ‘मोदीं’ना हरवणे विरोधकांना का जमले नाही?

Lok Sabha Election 2024 | लोकसभेत ‘मोदीं’ना हरवणे विरोधकांना का जमले नाही?

पुढारी ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच केला. त्यांनी त्यांच्या गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामगिरीचे कौतुकदेखील केले आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत 'एनडीए'च्या मित्रपक्षांसोबत ४०० चा आकडा पार करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः २०२४ मधील निवडणुकीसाठी हे टार्गेट निश्चित केले आहे. त्यांनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणते मुद्दे घेऊन मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते? ते आपण पाहुया… (Lok Sabha Election 2024)

अयोध्येत राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा नेहमीच महत्वाचा भाग राहिला आहे. २०१४ मधील निवडणुकीत भाजपने विकास आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा या दोन मुद्यावर जोर दिला. यूपीए सरकारचा दुसरा कार्यकाळ संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी याचसोबत गुजरातच्या विकासाचे मॉडेल हा प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा बनवला. रामजन्मभूमी आणि हिंदू राष्ट्र हे त्याच्या प्रमुख अजेंड्यावर कुठेही नव्हते, तरीही आरएसएसने पडद्यामागे शांतपणे काम केले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या आश्वासनांनी प्रेरित केले. मुख्य प्रवाहातील मतदारांमध्ये मात्र भ्रष्टाचारमुक्त भारत आणि नवी पहाट ही आश्वासने लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर मोदींची प्रतिमा आणि भाजपची प्रचार व्युहरचना ही २०१४ मधील निवडणुकीत गेमचेंजर ठरली, असे निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांनी त्यांच्या 'हाउ इंडिया व्होट्स अँड व्हॉट इट मीन्स' या त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.

आश्वासनांची पूर्तता हेच मोदींचे यश

काही प्रकरणांमध्ये अत्यंत ध्रुवीकरण निवडणूक लढाईचा परिणाम १० टक्के जागांवर होतो. २०१९ मधील मोदींच्या मोठ्या विजयाचे श्रेय त्यांच्या पहिल्या कार्यकाळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेला द्यावे लागेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान बालाकोट येथे केलेल्या हवाईहल्ल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्याचसोबत 'उरी' सारखे देशभक्तीपर व्यावसायिक चित्रपट आणि 'टॉयलेट: एक प्रेमकथा'सारखे उपक्रम या सर्वांमुळे त्यांची प्रतिमा उंचावली. तसेच 'राष्ट्रवाद', 'देशभक्त', 'पाकिस्तानात जा' हे शब्दसंग्रहाचा भाग बनले आहे जसे असे पूर्वी कधीही नव्हते. पण ते पूर्णपणे नाकारणे हे अक्षम्य दुर्लक्ष असेल. पण त्याला मोदी सरकारच्या सुशासनापेक्षा अधिक महत्त्व देणे हा त्याहून मोठा मूर्खपणा असेल, असे पुस्तकात म्हटले आहे.

मोदींचा करिष्मा

मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजना, जन धन, आयुष्यमान भारत, किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत अभियान या सारख्या कल्याणकारी योजनांमुळे त्यांना गरीबांचा मसीहा म्हणून स्थान निर्माण करण्यासाठी मदत मिळाली. पुढे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक करिष्मा चालल्याने भाजपला पाठोपाठ दोन निवडणुका जिंकता आल्या असेच म्हणावे लागेल.

काँग्रेसचे नेमकं काय चुकलं?

नरेंद्र मोदी यांचा २०१४ पासून प्रभाव वाढत गेल्यानंतर त्यांना टक्कर देणारा तगडा उमेदवार देण्यास काँग्रेस अपयशी ठरले. तसेच राहुल गांधी यांना कधीही यूपीएने पंतप्रधानपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केलेले नाही. कोणत्याही अधिकृत पदावरील कामाच्या अनुभवाच्या अभावामुळे राहुल गांधींना मतदारांनी गांभीर्याने घेतले नाही. पण माध्यमांनी नेहमीच त्यांनी मोदींचा प्रतिस्पर्धी आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून दाखवले. (Lok Sabha Election 2024)

(या लेखासाठी How India Votes And What It Means या पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करण्यात आला आहे.)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news