पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाची होणार आहे. अंतिम सामन्याविषयी क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज आपल मते व्यक्त करत आहेत. यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी मोठे व्यक्तव्य केले आहे. (Greg Chappell on ODI WC Final)
'क्रिकबझ'सोबत बोलताना ग्रेग चॅपेल म्हणाले, "भारतात सुरू असलेला एकदिवसीय (वन-डे) विश्वचषक स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू विराट काेहलीने वन-डेमध्ये सचिन तेंडुलकरसमोर ५० वे शतक झळकवून त्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीच्या या खेळीमुळे भारताने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले." (Greg Chappell on ODI WC Final)
गुजरातमध्ये होणाऱ्या वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विजयी होईल, असे मला वाटते. यापुढे ५० षटकांऐवजी ४० षटकांचा सामना खेळवण्यात येईल, अशा चर्चा रंगत असली तरी भारतात ज्याप्रमाणे 50 षटकांचा वर्ल्ड कप सुरू आहे ते पाहता 40 षटकांचे सामने भरवण्याची वेळ लवकर येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Greg Chappell on ODI WC Final)
पाचवेळा वन-डे वर्ल्ड जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतामध्ये भारताविरूद्ध सामना खेळताना कठीण जाणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियनं संघाला काही तरी नवीन शोधणे गरजेचे आहे. स्पर्धेतील साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाला भारताविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे त्यांना अंतिम सामन्यात सांभाळून खेळावे लागेल, असा सल्लाही ग्रेग चॅपेल यांनी दिला आहे.
हेही वाचा :