पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ने नुकत्याच आपल्या लग्नाचा खुलासा केला आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे की, तिने ४० दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज केली होती. आता तिचा पती फहद अहमद आहे तरी कोण, हे जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. राजकारणात असलेला फहद अहमद (Fahad Ahmad) कोण आहे? ज्याच्यासोबत स्वराने लॉन्गटाईन डेटिंग केलं आहे, त्या फहद अहमद विषयी जाणून घेऊया. (Swara Bhasker)
स्वरा भास्करने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने प्रेम ते लग्नापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिला शुभेच्छा देत आहेत. तिला तिच्या पतीविषयी विचारत आहेत. दोघांनी ६ जानेवारी २०२३ रोजी मुंबईत लग्न केल्याची माहिती समोर आलीय. स्वराने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये कोर्ट मॅरेजशी संबंधित कागदपत्रे आहेत.
फहद अहमद समाजवादी पार्टीचे युवा विभाग महाराष्ट्र मुंबईचा अध्यक्ष आहे. फेब्रुवारी १९९२ रोजी जन्मलेले फहद मूळचा उत्तर प्रदेशातील बरेलीचा राहणारा आहे. त्याने अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) मधून शिक्षण पूर्ण केले आहे पुढे त्याने एम फिलसाठी टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स शिक्षण घेतले. पुढे तो राजकारणात उतरला. फहदने टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स स्टुडेंट युनियनच्या महासचिव म्हणूनही काम केलं आहे.
जुलै २०२२ मध्ये तो अबू आसिम आजमी आणि रईस शेख यांच्या उपस्थितीत समाजवादी पार्टीत सहभागी झाला. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, स्वरा भास्करचा पती फहद अहमद तुरुंगात देखील गेला आहे. याचा एक व्हिडिओ फहदने आपल्या इन्स्टावर पोस्ट करून एक मोठी पोस्टदेखील लिहिली होती.
स्वराने अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. पुढील महिन्यात रीति-रिवाजानुसार, दोघे सात फेरे घेणार आहेत.