ब्रिटिश राजघराण्यात पुन्हा एकदा ‘पती, पत्नी और वो?’

ब्रिटिश राजघराण्यात पुन्हा एकदा ‘पती, पत्नी और वो?’
Published on
Updated on

लंडन : ब्रिटनचे सध्याचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांचा प्रिन्सेस डायनाशी संसार सुरू असताना या दोघांच्या नात्यात कॅमिला पार्कर यांचीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुपस्थिती होती. आता चार्ल्स यांचा थोरला मुलगा व राजसिंहासनाचा वारसदार विल्यमनेही वडिलांचाच कित्ता गिरवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. असं म्हटलं जातं की, आहाणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आणि ब्रिटनच्या सिंहासनाचे पुढील दावेदार प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट यांच्या नात्यामध्ये सध्या काहीशी तणावाची परिस्थिती आहे.

यामागं कारण ठरतेय ती म्हणजे प्रिन्स विल्यम यांची लेडी रोज हॅनबरी नावाच्या महिलेशी वाढती जवळीक. केटवर जीवापाड प्रेम करणार्‍या प्रिन्स विल्यम यांची ही कृती अनेकांना सुन्न करून जात आहे. पण, एकंदर चर्चा आणि सोशल मीडियावरील छायाचित्र पाहता त्यांचं लेडी रोझ यांच्याशी असणारं नातं औपचारिकतेपलीकडे असल्याचं स्पष्ट होत आहे.

2019 पासूनच त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. पण, गेल्या काही दिवसांत या नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं. सेव्हन्थ मार्केस ऑफ कोल्मोंडेलीमधील डेव्हिड कोलमॉन्डिले यांची पत्नी लेडी सारा रोझ यांनी यंदाचा व्हॅलेंटाईन डेसुद्धा ब्रिटनच्या राजघराण्यातील या राजकुमारासोबत व्यतीत केला. सोशल मीडियावर प्रिन्सचा याच दिवसाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दिसणारी 'ती' महिला केट नसून, लेडी रोझ होत्या हे आता उघड झालं आहे. प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स (सध्याचे राजे चार्ल्स) यांच्या लग्नाच्या आधीपासूनच त्यांचं कॅमिला यांच्याशी असणारं नातं वादाचा विषय ठरलं होतं.

राजघराण्यातील लग्नानंतरही डायना आणि प्रिन्स यांच्या नात्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या कॅमिला पार्कर यांची हजेरी असायची. किंबहुना पतीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांची कल्पना असतानाही प्रिन्सेस डायना मात्र कॅमिला यांच्याशी मैत्रीचं नातं टिकवून होत्या असं म्हटलं गेलं. डायना यांच्या मृत्यूनंतर चार्ल्स यांनी कॅमिलाशी विवाह केला आणि आता त्या 'क्वीन कॅमिला' आहेत!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news