Jawan Movie Actress : ॲटलीने प्रियामणि-नयनतारालाच का निवडलं?

प्रियामणि-नयनतारा
प्रियामणि-नयनतारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा जवान चित्रपट गेल्या दोन वर्षांपासून हा प्रोजेक्ट चर्चेत होता. या चित्रपटातील दोन अभिनेत्री प्रियामणि आणि नयनतारा या दोन्ही अभिनेत्रींचा दक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीत दबदबा आहे. (Jawan Movie Actress) प्रियामणिची शाहरुखसोबत काम करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी ती चेन्नई एक्सप्रेसमध्ये एका गाण्यात शाहरुखसोबत डान्स करताना दिसली होती. तर नयनतारानेही जवान चित्रपट दिग्दर्शक ॲटलीच्या चित्रपटात अभिनय केला आहे. या दोन्ही अभिनेत्रींबद्दल तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊया प्रियामणि आणि नयनतारा यांच्या या खास गोष्टी. (Jawan Movie Actress)

प्रियामणिचा साऊथचं नाही तर बॉलिवूडमध्येही दबदबा

प्रियामणिचा जन्म ४ जून १९८४ ला बंगळुरूमध्ये झाला होता. साऊथ चित्रपटांसोबतच ती बॉलिवूडमध्येही चित्रपट आणि सीरीजमध्ये दिसली होती. चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानसोबत वन टू थ्री फोर या गाण्यात ती परफॉर्म करताना दिसली होती. शिवाय द फॅमिली मॅन १ आणि २ या वेब सीरीजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयीसोबत ती दिसली होती. वयाच्या १८ व्या वर्षी प्रियामणि चित्रपट इंडस्ट्रीत आली. २००३ मध्ये एवारे अटागाडू या तेलुगु चित्रपटातून तिने डेब्यू केला. तब्बल ६० हून अधिक चित्रपटात काम करमारी प्रियामणिने मॉडलिंगदेखील केले. खास म्हणजे प्रियामणिला ६ भाषा येतात. आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कार २००६ ने सन्मानित करण्यात आले आहे.

कोण आहे नयनतारा, तिची इतकी चर्चा का होतेय?

नयनतारा शाहरुखसोबत जवान चित्रपटात दिसतेय. लॉकडाऊन काळात जवान चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली मुंबईत येऊन गेल्याचे वृत्त होते. तेव्हा त्याने शाहरूखसोबत या चित्रपटाची चर्चा केल्याचीही माहिती समोर आली होती. नयनताराने याआधी अ‍ॅटलीसोबत दोन चित्रपटांत काम केले आहे. ॲटली आणि नयनतारा यांच्यात चांगले संबंध आहेत. या दोघांनी 'राजा रानी आणि बिजिल'मध्ये एकत्र काम केलं आहे.

नयनताराने अनेक टीव्ही शोज मध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे ती तमिळ कॉमेडी Mookuthi Amman मध्ये दिसली होती. यामध्ये तिने एका देवीची भूमिका साकारली होती. डायना मरियम कुरियन असे तिचे खरे नाव आहे. ते तिने बदलून नयनतारा असे केले. ती कॉलेजमध्ये असताना मॉडलिंग करायची. २००३ मध्ये दिग्दर्शन सतयन अंथिकडने मल्याळम चित्रपट 'मनास्सीनाकरे'मध्ये तिला ब्रेक दिला. या चित्रपटाच्या माध्यमातून नयनताराने मल्याळम चित्रपटात पाऊल ठेवले. त्यानंतर २००५ मध्ये नयनताराने 'अय्या' चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीतही पदार्पण केले. त्यानंतर ती एक तेलुगू चित्रपट 'लक्ष्मी'मध्ये दिसली. तिने एकानंतर एक तेलुगु -तमिळ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. नयनताराने २०१० मध्ये 'सुपर' या कन्नड चित्रपट इंडस्ट्रीतूनही डेब्यू केला.

'श्री राम राज्यम' मध्ये सीतेच्या भूमिकेसाठी नयनताराला सर्वोत्कृष्ट तेलुगु अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिने विक्रम, कमल हासन, जूनियर एनटीआर, धनुष, चिरंजीवी, राम चरण, सूरिया या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news