Who is Ganpat Gaikwad? | शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?

Who is Ganpat Gaikwad? | शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. ही घटना उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात घडली. या गोळीबारात कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना ५ गोळ्या लागल्या, तर बैलगाडा फेम राहुल पाटील यांना एक गोळी लागली. या दोन्ही जखमीना उल्हासनगरच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी पहाटे महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया करून ५ गोळ्या त्यांच्या शरीरातून काढण्यात आल्या.

दरम्यान, या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सर्वणकर या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि १२०बी (गुन्हेगारी कट) यासह भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

गणपत गायकवाड कोण आहेत? (Who is Ganpat Gaikwad?)

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार आहेत. ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. ते प्रथम २००९ आणि २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना भाजपचे तिकीट मिळाले होते. गणपत गायकवाड यांच्यावर १८ प्रलंबित गुन्हेगारी खटले असल्याचे त्यांच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले होते.

"होय, मी स्वतः (त्याला) गोळी मारली. याचा मला काही खेद नाही. जर माझ्या मुलाला पोलिस स्थानकात पोलिसांसमोर मारहाण केली जात असेल तर मी काय करू," असे गणपत गायकवाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्यांनी पाच राऊंड फायर केल्याचा दावा केला. (Who is Ganpat Gaikwad?)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारच जन्माला येतील. त्यांनी माझ्यासारख्या चांगल्या माणसाला आज गुन्हेगार बनवले आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिस स्थानकात गोळीबाराचा थरार! नेमकं काय घडलं?

द्वारली गावात एकनाथ जाधव यांच्या मालकीचा एक भूखंड होता. हा भूखंड गणपत गायकवाड यांच्या कंपनीने १९९६ साली विकत घेतला होता. तीन वेळा पैसे घेऊन ये जाधव कुटुंब हे नोंदणी कार्यालयात येत नसल्याने गायकवाड यांनी न्यायालयातून या भूखंडाची मालकी मिळवली होती. या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोनशे ते तीनशे जणांच्या महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी या भूखंडात घुसून कुंपणाचे नुकसान केले. याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा हिललाईन पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखल करून घेण्यास काम टाळाटाळ केली. वैभव गायकवाड यांनी ही गणपत गायकवाड यांना सांगितली. त्याचदरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे त्यांच्या टीमसह पोचले. त्यांच्या मागोमाग गणपत गायकवाड हिललाईन पोलीस ठाण्यात पोहचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर त्यांच्या दालनात दोन्ही गट बसलेले होते. त्याचवेळी वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या समर्थक दालनाबाहेर वाद झाल्याने गोंधळ निर्माण झाला. हा वाद सोडविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे बाहेर गेले असताना गणपत गायकवाड यांनी त्यांची परवानाधारी रिव्हॉल्वर काढून महेश गायकवाड यांच्यावर ५ तर राहुल गायकवाड यांच्यावर एक गोळी झाडली.

याचवेळी गोळीबाराच्या आवाजाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप हे पुन्हा दालनात परतले. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या अंगावर रिव्हॉल्वरच्या दस्त्याने त्याला मारहाण करीत होते. जगताप यांनी तात्काळ आमदार गणपत गायकवाड यांच्या हातातील रिव्हॉल्वर खेचून घेतली. त्याचवेळी आमदार गायकवाड यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे हा दालनात येऊन त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्वरने महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडण्यास चालू केले. त्यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडची रिव्हॉल्वर खेचून घेत दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news