कोरोमंडल एक्स्प्रेसचा चालक कुठे आहे? कुटुंबसुद्धा हतबल

कोरोमंडल एक्स्प्रेसचा चालक कुठे आहे? कुटुंबसुद्धा हतबल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताला तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला असला, तरी धक्कादायक म्हणजे, कोरोमंडल एक्स्प्रेसचे लोकोपायलट गुणनिधी मोहंती यांना त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही भेटू दिलेले नाही. अपघात झाल्यापासून गुणनिधी यांना आपण भेटलोच नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ते नक्की कुठे आहेत, हेसुद्धा स्पष्ट झालेले नाही.

गुणनिधी हे कटकच्या गजबजलेल्या शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या नापाडा येथे राहतात. अपघात झाल्यापासून या गावात एकच चर्चा आहे. याबाबत त्यांचे ८० वर्षीय वडील विष्णू चरण मोहंती यांनी म्हटले आहे की, गावातील प्रत्येकाला वाटते माझा मुलगा या अपघाताला जबाबदार आहे, तो गेल्या २७ वर्षांपासून ट्रेन चालवत आहे. त्याने कधीही चूक केली नव्हती. त्या संध्याकाळी काय झाले ते कसे कळणार? मी माझा मुलगा घरी येण्याची वाट पाहात आहे.

रेल्वेने ठेवले कानावर हात

गुणनिधी यांच्या प्रकृतीविषयी आम्ही माहिती देऊ शकत नाही. कारण, आरोग्य हा फार खासगी विषय आहे. हे प्रकरण सीआरएस आणि सीबीआयकडे प्रलंबित असल्याने आम्ही यासंदर्भात अधिक माहिती देऊ शकत नाही, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news