Blood : नवीन रक्त तयार होताना कुठे जाते जुने रक्त?

Blood : नवीन रक्त तयार होताना कुठे जाते जुने रक्त?

वॉशिंग्टन : मानवाचे शरीर हे खूप आश्चर्यकारक आहे. शरीरात दिवसभरात इतक्या सगळ्या गोष्टी सुरू असतात ज्याविषयी आपल्याला स्वतःलाच माहीत नसते. यातील एक गोष्ट म्हणजे 'रक्त'. आपल्या शरीरात रोज नवीन रक्त तयार होतेे. अशा परिस्थितीत मग आपले जुने रक्त कुठे जाते? याविषयी फारशी कल्पना नसेलही. पण अर्थातच, हे जुने रक्त कुठे जाते, हे बरेच रंजक आहे.

रक्त हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय माणूस जगू शकत नाही. रक्त आपल्या शरीरातील छोट्यातल्या छोट्या भागांपर्यंत पोहोचत असते. जेव्हा आपण काही खातो किंवा पितो तेव्हा आपले शरीर हे अन्न शोषून घेते आणि हाडांपर्यंत पोहोचवते. येथूनच रक्त तयार करण्याचे काम सुरू होते. हाडांमध्ये लाल अस्थिमज्जा भरलेला असतो, तो लाल रक्तपेशी निर्माण करतो. अस्थिमज्जाच्या आत सर्व रक्तपेशी स्टेम सेल नावाच्या विशेष पेशीपासून बनवल्या जातात. जेव्हा स्टेम सेलचे विभाजन होते, तेव्हा लाल रक्तपेशी, पांढर्‍या रक्तपेशी किंवा प्लेटलेट पेशी बनते. शरीर रोज नवीन रक्त बनवतं; त्यामुळे ताजेपणा टिकून राहतो.

आता रक्त संपण्याचे दोन मार्ग आहेत. जुनं रक्त मुख्यतः लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतं. दुसरं म्हणजे जुनं रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागात जातं आणि त्याठिकाणी नवीन रक्त तयार होतं. हा रक्तप्रवाह मुख्यतः शरीराच्या रक्ताभिसरण प्रणालीद्वारे होतो. ज्यामध्ये हृदय, धमन्या आणि शिरा यांचा समावेश होतो. या प्रक्रियेमुळे शरीरातील जुने रक्त नष्ट होऊन नवीन रक्त तयार होत राहते. या प्रक्रियेमुळे ताजेपणाही कायम राहतो. एखाद्याच्या शरीरातून अर्धा लिटर रक्त बाहेर काढले तर ते बनवायला जास्त वेळ लागत नाही. तो 3 ते 4 दिवसांत बरा होतो. मात्र, हे त्या व्यक्तीच्या आहारावर आणि शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे रक्तदान केल्यामुळे आपले रक्त कमी होत नाही. थोडावेळ विकनेस वाटू शकतो. मात्र, आपल्या शरीरात लवकर रक्त तयार होत असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news