रात्रीचे जेवण कधी करावे?

रात्रीचे जेवण कधी करावे?

लंडन : सध्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. ऑफिसमध्ये अनेक तास बसून काम करणे, वेळेत न जेवणे, वेळेत न झोपणे अशा अनेक कारण आजारांना निमत्रंण देत असतात. अनेकांना असाही प्रश्न असतो की, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण याची ठराविक वेळ कोणती असते? यामध्ये तर अनेकांना रात्री अजिबात काहीही न खाण्याची आणि स्नॅक खाण्याची सवय असते. पण या दोन्ही गोष्टी शरीरासाठी घातक ठरू शकतात. याशिवाय जेवल्यानंतर लगेच झोप लागणे, ही मोठी चूक आहे.

वजन कमी करण्यासाठी अने क जण रात्री कार्बोहायड्रेट टाळतात. परंतु, जर तुम्हाला तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करायचे असेल, तर तुम्ही ते केव्हा आणि किती वापरता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही रात्री, दुपारच्या जेवणात किंवा दिवसभरातील सर्व जेवणातून थोड्या प्रमाणात कर्बोदक पदार्थ वगळून तुमच्या आहाराचे नियोजनदेखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला सतत कॅलरी किंवा चरबी वाढण्याची चिंता करावी लागणार नाही. चला तर मग, जाणून घेऊया रात्रीच्या जेवणाची योग्य पद्धत आणि वेळ कोणती आणि रात्री कोणते अन्न खावे? रात्रीचे जेवण नेहमी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान करावे.

पण आजकाल शहरांमध्ये रात्रीच्या वेळी कामामुळे उशीर झाला की, याच्या परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. कारण रात्री उशिरा खाल्ल्याने वजन वाढून अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तज्ज्ञ सांगतात, रात्री भूक लागते त्यापेक्षा कमी खा. कारण रात्री जास्त खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. परिणामी तुमचे वजन वाढू शकते. रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जाऊ लगतात. पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर रात्री खाणे आणि झोपणे यामध्ये नेहमी 2-3 तासांचे अंतर ठेवा. रात्री सतत उशिरा खाण्याच्या सवयीमुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. वजन वाढल्यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित होते आणि नंतर यामुळे हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवतात. रात्री लवकर झोप येत नाही, अशी लोकांची अनेकदा तक्रार असते. त्याचे मूळ कारण उशिरा जेवण करणेदेखील असू शकते. तुमचे शरीर अन्न नीट पचवू शकत नाही, ज्यामुळे झोप कमी होऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news