Whatsapp Update: व्हॉट्स ॲपची युजर्ससाठी नवी सुविधा; जाणून घ्या काय आहे नवीन फिचर?

Whatsapp Update: व्हॉट्स ॲपची युजर्ससाठी नवी सुविधा; जाणून घ्या काय आहे नवीन फिचर?

पुढारी ऑनलाईन: व्हॉट्स ॲप हे अत्यंत लोकप्रिय ॲप आहे. व्हॉट्स ॲपने यूजर्सच्या अडचणी आणि गरज विचारत घेता, वेळोवेळी सातत्याने आपल्या ॲपमध्ये बदल केले आहेत. व्हॉट्स ॲपने मेसेजसंदर्भात नुकतिच एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पाठवलेल्या मेसेज युजर्सना दोन दिवसांनी देखील डिलिट करता येणार आहे.

युजर्सने पाठवलेल्या मेसेज डिलिट करण्याची मर्यादा व्हॉट्सॲपने  वाढवलेली आहे. या मेसेज अपडेटची माहिती कंपनीने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. या नवीन फिचरमुळे पाठवलेला मेसेज डिलीट करण्यासाठी अधिकचा वेळ देण्यात आला आहे. आता व्हॉट्स ॲप युजर्स पाठवलेला मेसेज दोन दिवसांपर्यंत म्हणजेच २४ तासानंतरही Delete for Everyone करता येणार आहे. हे फीचर त्या युजर्ससाठी खूप महत्त्वाचे आहे जे चुकीचा मेसेज पाठवून सतत डिलिट करत असतात. यापूर्वी हा मेसेज डिलिट करण्यासाठी यूजर्सला मोजकाच म्हणजे जेमतेम केवळ एक तासाचा वेळ मिळत होता.

WhatsApp (व्हॉट्सॲप)
WhatsApp (व्हॉट्सॲप)

यापूर्वी ही मर्यादा ६८ मिनिटांची होती. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार ॲपल देखील असे फीचर आणण्याची तयारी करत आहे. एकीकडे व्हॉट्स ॲपने मेसेज डिलिट करण्याचा कालावधी वाढवला आहे. तर ॲपलने टाईम लिमिट टेस्टींग करताना, १५ मिनिटांनी कमी करत तो २ मिनिट केला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news