Arthritis : संधिवातात काय खावे, काय टाळावे?

Arthritis
Arthritis

Arthritis बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विचित्र सवयींमुळे अनेक शहरी लोकं अनेक आजारांना बळी पडत आहेत. यापैकी एक आजार म्हणजे संधिवात. हा आजार पूर्वी वयोवृद्धांना सतावत असे. पण सध्याच्या काळात हा आजार सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. Arthritis संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांना हाडे आणि सांधेदुखीचा सामना करावा लागतो. या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आज आपण जाणून घेऊयात की संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

ड्राय फ्रुटस् : ड्राय फु्रटस्मध्ये  मोनोअनसॅच्युरेटेड फॅट पुरेशा प्रमाणात असतात. ज्यामुळे सांध्यांची सूज कमी होण्यास मदत होते. Arthritis संधिवाताचे रुग्ण त्यांच्या आहारात बदाम, पिस्ता, अक्रोड इत्यादींचा समावेश करू शकतात.

हळद : हळद किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीतच आहे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे सांधेदुखी Arthritis आणि सूज कमी करण्यास मदत करतात. हळद तुम्ही दुधात मिक्स करून सेवन करू शकता.

धान्य खा : तुम्हालाही ही समस्या Arthritis असल्यास आहारात संपूर्ण धान्य समाविष्ट करू शकता. त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे.

या गोष्टी खाणे टाळा :

1. तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
2. मीठ जास्त प्रमाणात सेवन करू नका.
3. गोड पदार्थ खाणे टाळावे.
4. मद्यपान टाळावे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news