Thermos real name : ‘थर्मास’चे खरे नाव काय?

Thermos
Thermos
Published on
Updated on

नवी दिल्ली : काही कंपन्यांची उत्पादने इतकी प्रसिद्ध होत असतात की त्या उत्पादनालाही कंपनीचेच नाव मिळत असते. 'डालडा' हे खरे तर कंपनीचे नाव आहे. ही कंपनी वनस्पती तुपाची विक्री करू लागल्यावर अशा वनस्पती तुपालाच 'डालडा' म्हटले जाऊ लागले. तसाच प्रकार 'थर्मास' बाबत आहे. 'थर्मास' (Thermos) हे खरे तर कंपनीचे नाव आहे. मग अशा प्रकारच्या बाटलीला काय म्हणतात, हे तुम्हाला माहिती आहे का?

थर्मासचा (Thermos) वापर आपल्यापैकी बर्‍याच लोकांच्या घरी केला जातो. यामध्ये तुम्ही गरम किंवा थंड पाणी ठेवू शकता. यामध्ये जर तुम्ही गरम पाणी ठेवाल, तर ते पाणी बराच काळ गरम राहते. तसेच जर तुम्ही यामध्ये थंड पाणी ठेवाल तर ते बराच काळ थंड देखील राहते. या बॉटलचा वापर अनेक लोक चहा किंवा सूप गरम ठेवण्यासाठी देखील वापरतात.

या पाण्याच्या बॉटलला किंवा भांड्याला आपण 'थर्मास' म्हणतो. मात्र, विशेष काचेचे प्रोडक्ट बनवणार्‍या कंपनीचे नाव 'थर्मास' आहे आणि 'या' कंपनीमुळे याला बाटलीला 'थर्मास' (Thermos) असे नाव पडले आहे. सन 1892 मध्ये, स्टोटिश शास्त्रज्ञ सर जेम्स देवल यांनी प्रथम हे तयार केले होते. यावेळी त्यांनी या स्पेशल फ्लास्कमध्ये तापमान राखण्यासाठी केमिकलचा वापर केला होता. ज्यानंतर त्याचे फायदे लक्षात घेता तो खूपच लोकप्रिय झाला आहे.

थर्मास कंपनी (Thermos) 'या' खास प्रकारच्या बाटल्या आणि जेवणाचे डबे बनवण्यासाठी ओळखली जाते. ज्यामध्ये अन्न किंवा पाणी गरम अथवा थंड राहण्यास मदत करते. थर्मास कंपनी अशाच प्रकारच्या बाटल्या आणि टिफिन बॉक्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आधी थर्मास ही अमेरिकन कंपनी होती; पण नंतर ती जपानी लोकांनी घेतली. मग थर्मास ही मूळ कंपनी बनली आणि आणखी अनेक कंपन्या तिच्या अंतर्गत काम करू लागल्या.

आता प्रश्न असा आहे की असा आहे की, थर्मास (Thermos) कंपनीचे नाव आहे. तर या बाटलीला किंवा भांड्याला काय म्हणतात? तर अशा प्रकारच्या भांड्याला 'व्हॅक्यूम फ्लास्क' म्हणतात किंवा याला फक्त 'फ्लास्क' देखील म्हटले जाते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news