स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर कशासाठी होतो?

स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर कशासाठी होतो?
Published on
Updated on

नवी दिल्ली : स्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा जणू काही अविभाज्य भाग बनला आहे. केवळ कॉल करणे किंवा घेणे इतक्या कामासाठी हे उपकरण मर्यादित नाही. हे एक बहुपयोगी उपकरण बनलेले आहे. सर्चिंगपासून ऑनलाईन पेमेंटपर्यंत अनेक कामे फोनच्या सहाय्याने केली जात असतात. आता 'विवो'ने एक रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये भारतात स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर कशासाठी केला जातो याचा खुलासा झाला आहे.

जर स्मार्टफोनवर यूजर अक्टिव्हिटीचा विचार केला तर स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर हा यूटिलिटी (उपयुक्त वस्तूंच्या) बिलाचे पेमेंट करण्यासाठी होतो असे दिसून आले. रिपोर्टनुसार सुमारे 86 टक्के लोक फोनवरून यूटिलिटी बिलाचे पैसे देतात. ऑनलाईन शॉपिंगसाठी स्मार्टफोनचा वापर सुमारे 80.8 टक्के केला जातो. तसेच सुमारे 61.8 टक्के लोक स्मार्टफोनचा वापर जरूरी सामानाची ऑर्डर देण्यासाठी करतात. ऑनलाईन सर्व्हिससाठी 66.2 टक्के लोक स्मार्टफोन वापरतात.

याशिवाय ग्रॉसरी आयटम म्हणजेच किराणा मालाची ऑर्डर देण्यासाठी 73.2 टक्के लोक स्मार्टफोन वापरतात. डिजिटल कॅश पेमेंटसाठी 58.3 टक्के लोक स्मार्टफोन वापरतात. जर स्मार्टफोन वापराच्या प्रमाणाचा विचार केला तर सुमारे 62 टक्के पुरुषांकडे स्मार्टफोन असतो. महिला याबाबतीत मागे असल्याचे दिसून आले. देशात केवळ 38 टक्के महिलांकडेच स्मार्टफोन आहे. मोठी शहरे व छोट्या शहरांची तुलना केली तर 58 टक्क्यांसह मेट्रो सिटी पुढे आहेत. त्यानंतर 41 टक्क्यांसह नॉन मेट्रो सिटींचा क्रमांक लागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news