वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्टेरॉलची पातळी किती हवी?

वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्टेरॉलची पातळी किती हवी?

नवी दिल्ली : आपल्या रक्तात मेणासारखा एक पदार्थ आहे, जो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. या मेणासारख्या पदार्थाला कोलेस्टेरॉल असं म्हणतात. यातही गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल असे दोन प्रकार आहेत. जेव्हा रक्तातील हे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं आणि आपल्या मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशात आपल्या गंभीर आणि हानिकारक आजारांचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून बदललेली जीवनशैली आणि बाहेरचे अनहेल्दी पदार्थ, वाढता ताण आणि तासंतास बसून काम यामुळे पुरुष असो किंवा स्त्री यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. वयानुसार आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल लेव्हल किती असावी, याबद्दल तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोलेस्टेरॉल 2 प्रकारची असून, डेंसिटी लिपोप्रोटिन आणि हाई डेंसिटी लिपोप्रोटिन असं त्यांना म्हटलं जातं. जर तुमच्या रक्तात 'एलडीएल'चे प्रमाण वाढलं, तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतो. ज्याला डॉक्टरी भाषेत 'प्लॅक' असं म्हणतात. आर्टरीजमध्ये प्लॅकमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची भीती वाढते. तर रक्तात 'एचडीएल' म्हणजेच गुड कोलेस्टेरॉल शरीरासाठी चांगलं असतं. 19 वर्षांपर्यंतच्या तरुणांच्या शरीरात कोलेस्टेरॉल लेव्हल ही 170 mg/ dl पेक्षा कमी असली पाहिजे, असं मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

यात non- HDL 120 mg/ dl पेक्षा कमी आणि LDL 100 mg/ dl पेक्षा कमी पाहिजे. तर HDL 45 mg/ dl पेक्षा जास्त पाहिजे. 20 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचं एकूण कोलेस्टेरॉल 125-200 mg/ dl च्या मध्ये असायला हवं. तर non- HDL लेव्हल 130 mg/ dl पेक्षा कमी आणि LDL लेव्हल 100 mg/ dl पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. HDL लेव्हल 40 mg/ dl किंवा त्यापेक्षा अधिकं असणे गरजेचं आहे. 20 वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात एकूण कोलेस्टेरॉल 125-200 mg/ dl मध्ये पाहिजे. तर non- HDL लेव्हल 130 mg/ dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/ dl पेक्षा कमी पाहिजे. तर HDL लेव्हल 50 mg/ dl किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news