सेमीकंडक्टर चिप म्हणजे काय? तिचा तुटवडा का आहे?

सेमीकंडक्टर चिप म्हणजे काय? तिचा तुटवडा का आहे?

नवी दिल्ली : सेमीकंडक्टर्सच्या तुटवड्यामुळे जगभरातील उद्योग व्यवसायावर वाईट परिणाम होत आहे. विशेषतः वाहन उद्योग क्षेत्रावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. यावरून सेमीकंडक्टरचे महत्त्व अधोरेखित होते. काय आहे सेमीकंडक्टर? आणि त्याचा तुटवडा का निर्माण झाला? चला जाणून घेऊया.

कार खरेदी करणे हे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिले जाते. जगभर ही मानसिकता आहे, गाडीतील सुविधा पाहूनच सामान्य लोक ठरवतात की, माणसाचा दर्जा किती आहे. आजच्या सामान्य कारमध्ये इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. तंत्रज्ञानासोबतच कारसोबत देण्यात येणार्‍या सुविधाही इलेक्ट्रॉनिक होत आहेत. या सेमीकंडक्टर चिप्स आहेत आणि आजच्या कारची अशा चिपशिवाय कल्पनाही करता येत नाही. इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनाने, कार आणि या सेमीकंडक्टर चिप्समधील संबंध अधिक खोल आणि मजबूत झाले आहेत. पण गेल्या काही काळापासून ऑटोमोबाईल उद्योग अशा चिप्सच्या तुटवड्याशी झगडत आहे. चिप हे पोर्ट डिव्हाईस आहे, ते डेटा सेव्ह करण्यासाठी वापरले जाते. ऑटोमोबाईल उद्योगापासून ते इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपर्यंत चिप्सचा तुटवडा आहे.

सेमीकंडक्टर चिप्सचा वापर इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर स्टिअरिंग आणि ब्रेक्स ऑपरेट करण्यासाठी केला जातो. नवीन वाहनांसाठी ही चिप अत्यंत महत्त्वाची आहे. ही एक छोटी चिप आहे, जी कारमध्ये वापरली जाते. हायटेक वाहनांमध्ये अनेक प्रकारच्या चिप्स वापरल्या जातात. सेफ्टी फीचर्समध्येही चिप वापरली जाते. एक प्रकारे सेमीकंडक्टरला इलेक्ट्रॉनिक घटकांचे 'मेंदू' म्हणतात. एवढेच नाही तर ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहेत. नेहमीच्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अधिक चिप्स वापरतात. त्यामुळे चिप पुरवठ्याअभावी इलेक्ट्रिक वाहनांनाही फटका बसू शकतो. सेमीकंडक्टर ही अशी सामग्री आहे,

ज्यामध्ये विद्युत वाहक आणि विद्युत रोधक यांच्यातील गुणधर्म असतात. त्याचे मुख्य कार्य विद्युत प्रवाह नियंत्रित करणे आहे. हा सेमीकंडक्टर शुद्ध घटकांपासून बनलेला असतो, सामान्यतः सिलिकॉन. कंडक्टरचे गुणधर्म बदलण्यासाठी, त्यात काही विशेष अशुद्धता जोडली जाते, ज्याला डोपिंग म्हणतात. डोपिंगद्वारेच सेमीकंडक्टरचे इच्छित गुणधर्म विकसित केले जाऊ शकतात. या सामग्रीचा वापर करून एक लहान इलक्ट्रिकल सर्किट बनवले जाते, ज्याला चिप म्हणतात. आता कारमध्ये विविध प्रकारचे सेन्सर बसवले जात आहेत आणि वाढत्या वैशिष्ट्यांसह सुरक्षा यंत्रणा देखील इलेक्ट्रॉनिक चिप्सद्वारे चालविली जाते आणि नियंत्रित केली जाते. कोव्हिड महामारीमुळे तसेच अन्य काही कारणांमुळे जगभरात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news