व्हेल माशाची ६ कोटींची उल्टी जप्त, चौघांना अटक

व्हेल माशाची ६ कोटींची उल्टी जप्त, चौघांना अटक

गुप्त माहितीच्या आधारे दु . २.०० वाजता शिंदे अंबेरी ता. संगमेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत अज्ञात व्यक्तीनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून वनविभाग रत्नागिरी व स्थानिक पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे . त्यांच्याकडून सुमारे 6 कोटींची व्हेल माशाची उलटी व एक कार जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी वन व पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रसाद प्रविण मयेकर , वय ३२ , रा . भाटयेगिन्या ता . रत्नागिरी जि . रत्नागिरी , नरेंद्र वसंत खाडे , वय ५४ , रा . काखरतळे ता . महाड जि . रायगड , सत्यभामा राजू पवार , वय ४५ , रा . दत्तनगर , माणगाव ता . महाड जि . रायगड ,अजय राजेंद्र काणेकर , वय -३६ , रा . असगोली ता . गुहागर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून व्हेल मासा उल्टी ( Ambergris ) ६.२ किलो व कार वाहन क्र . MHOBAN4033 जप्त करून घेतली आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुध्द वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम , १ ९ ७२ अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी , चिपळूण यांचेकडील प्र.गु.रि. ०२/२०२१ दि . २१/१०/२०२१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

व्हेल माशाची उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो . त्याला अॅम्बरग्रीस असे म्हणतात . व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो . या उल्टीतुन सुगंधी द्रव्ये ( सुगंधी अत्तर , बॉडी स्प्रे इ. ) करता मोठया प्रमाणात मागणी असलेने जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला मोठी किंमत मिळते. त्याचा पांदुरका पिवळसर तपकिरी रंग आहे. या दगडासारख्या गोळयाला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो. व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतड्यामध्ये जातात आणि तेथे अॅम्बरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते. या पदार्थाची निर्मिती होण्यासाठी अनेक वर्षे लागतात, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मादामारक , मालदीव, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहामा या देशांच्या किनाऱ्यावर हे सुगंधी गोळे सापडले आहेत.

सदरची कार्यवाही मुख्य वनसंरक्षक ( प्रा ) , कोल्हापूर डॉ . व्ही . क्लेमेंट बेन . जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . मोहितकुमार गर्ग , विभागीय वन अधिकारी , रत्नागिरी ( चिपळूण ) दिपक खाडे , सहाय्यक वनसंरक्षक , रत्नागिरी ( चिपळूण ) श्री . सचिन निलख , स्थानिक पोलीस विभाग यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी , चिपळूण श्रीम , राजश्री किर , वनपाल सावर्डे , श्री . छ . म . आखाडे , वनपाल गुहागर , श्री . स.वि. परशेटये , वनपाल खेड , श्री . सु . रा . उपरे , सहाय्यक पोलीस फौजदार साव , श्री . प्र.अ. गमरे , म.पो. हे कॉन्टेबल सावर्डे श्रीम . सु . सं . मोहिते , वनरक्षक कोळकेवाडी , श्री . अ . रा . शिंदे , बनरक्षक रामपूर , श्री . द . रा . सुर्वे वनरक्षक नांदगाव , श्री . रा . प . बंबकर , वनरक्षक गुढे श्रीम . अ . अ . जाधव , मनरक्षक बनउपज तपासणी नाका श्री . वि . द . झाडे , वनरक्षक बनउपज तपासणी नाका श्री . कृ . इरमले , वनरक्षक रानदी , श्री . अरविंद मांडवकर , वनरक्षक काढवली श्री.अ.अ. ढाकणे , वनरक्षक अदूर श्री . सं था . दुडगे यांनी कार्यवाही पार पाडली .

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news