पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील सर्वांत मौल्यवान ठरलेली स्टार्टअप We Workने दिवाळखोरी जाहीर केली आहे. कार्यलयीन कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल घडवण्यात We Workचा मोठा वाटा आहे. मोठे उत्पन्न असतानाही नफा मिळवू न शकल्याने ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. विशेष म्हणजे जपानच्या सॉफ्ट बँकची या स्टार्टअपमध्ये ६० टक्के गुंतवणूक आहे. We work bankruptcy
We Work या कंपनीला सुस्थापित करण्यासाठी सॉफ्ट बँकने आतापर्यंत अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. कर्जाचे आणि जागांच्या भाड्यांचे पुनर्घटन झाले नाही तर ही कंपनी रुळावर येणे आता अशक्य बनले आहे. We work bankruptcy
We Workने बऱ्याचा जागा भाड्याने घेतना मोठी रक्कम मोजली आहे, तर दुसरीकडे अनेक कंपन्यात वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने कॉर्पोरेट कंपन्या We Workमधील जागा सोडू लागले आहेत. २०२३च्या दुसऱ्या तिमाहीत We Workने मिळवलेल्या एकूण महसुलातील ७४ टक्के रक्कम ही भाड्यावर खर्च झालेली आहे.
अॅडम न्यूमन या तरुणाने ही कंपनी सुरू केली होती. या स्टार्टअपचे बाजारमूल्य तब्बल ४७ अब्ज डॉलर इतके होते. सॉफ्ट बँक, बेंचमार्क, जेपी मॉर्गन अशा नामवंत बँका आणि गुंतवणूक संस्थांनी या कंपनीत पैसा लावला आहे. पण अॅडम न्यूमनला या कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर संदीप मथरानी या कंपनीचे सीईओ बनले, त्यानंतर डेव्हिड टोली यांच्याकडे कंपनीची कमान सोपवण्यात आली.
दिवाळखोरी जाहीर केलेली We Work Global आणि भारतातील We Work इंडिया या दोन कंपन्या स्वतंत्रपणे कार्यरत आहेत, त्यामुळे भारतातील व्यवसायावर परिणाम होणार नाही, असे We Work इंडियाने म्हटले आहे.
We Work जगभरातील ३९ देशांत ७७७ ठिकाणी कार्यरत आहेत. पण ही कंपनी नफ्यात आलेली नाही. मोठ्या शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी व्यावसायिक जागा दीर्घ मुदतीच्या भाड्याने घ्यायची, त्यानंतर या जागेत पूर्ण फर्निचरसह ऑफीस, कॅफेटेरिया, कम्युनिट स्पेस अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्यायची, अशी We Workची कार्यपद्धती आहे. वर्कस्टेशन प्रमाणे ही जागा भाड्याने मिळते.
हेही वाचा