पाकिस्तानी क्रिकेटर्स भारतात आले, आता कलाकारांनाही चित्रपटांत काम करता येईल का?: राहुल ढोलकिया

राहुल ढोलकिया
राहुल ढोलकिया

पुढारी ऑनलाईन डेस्क – 'रईस' चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. मुद्दा आहे-पकिस्तानी कलाकारांचा. २७ सप्टेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानी क्रिकेटर्स हैदराबादला पोहोचले. येथे सर्व खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. उरी दहशतवादी हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली होती. पण आता पाकिस्तानी खेळाडूच भारतात आल्यानंतर 'रईस'चे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी पोस्ट लिहित कलाकारांबद्दल आशा व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या – 

राहुल ढोलकिया यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी कलाकार आणि गायकही भारतात परफॉर्म करण्याची आशा व्यक्त केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय-'आता जेव्हा पाकिस्तानी क्रिकेटर्स ऑफिशिअली इथे आले आहेत. तर काय आम्ही पाकिस्तानी कलाकारांनादेखील चित्रपटांध्ये काम करण्यासाठी निमंत्रित करू शकतात? वा म्युझिशियन परफॉर्म करण्यासाठी?'

काय म्हणाले नेटकरी?

आता या पोस्टवर लोकांनी कॉमेंट्स करत राहुल यांना प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं- बॉलीवूड नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहे. जर क्रिकेटर्सना परवानगी मिळू शकते तर कलाकारांना का नाही? आणखी एका युजरने लिहिलं- का? इंडियामध्ये टॅलेंट कमी आहे काय? तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे – तुम्हाला त्यांच्या कुटुंबीयांना विचारलं पाहिजे, जे बॉर्डरवर तैनात आहेत, तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news