Water Supply | ‘या’ पाच जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा शनिवारी बंद राहणार

Water Supply | ‘या’ पाच जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा शनिवारी बंद राहणार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
स्मार्ट सिटी कंपनीकडून जलवाहिनीशी संबंधित कामांमुळे शनिवारी (दि.२) शहरातील बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी (दि.३) कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शुक्रवारी (दि.१) बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथे वाहिनीत जोडणी केली जाणार आहे. तसेच ६०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीची जोडणी करण्याचे नियोजन आहे. या कामांसाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून एका बाजूची पाणी उचलण्याची व्यवस्था बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे धरणातून बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा होणार नाही. विस्कळीत पाणीपुरवठाबाबत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. सातपूर, सिडको येथील भागात पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या प्रभागावर होणार परिणाम
– नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४ व १५ चा काही भाग, प्रभाग १६, २३ संपूर्ण भागाचा समावेश असेल.
– नाशिक पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक सात व १२ चा काही भाग, तर १३ संपूर्ण,
– पंचवटी विभागातील सर्व प्रभाग. म्हणजे प्रभाग क्रमांक एक ते सहा अशा सहा प्रभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
– नाशिकरोड विभागात देखील सर्व प्रभागात पाणी पुरवठा बंद असेल. नाशकरोडमध्ये प्रभाग १७, १८, १९, २०, २१ व २२ या प्रभागांचा समावेश आहे.
– नविन नाशिक विभागातील प्रभाग २४, २५, २८ व २९ मधील काही भागांचा समावेश आहे. यामध्ये हेडगेवार चौक, दत्त मंदीर, पवननगर, शुभम पार्क, रामेश्वरनगर, बनदवणेनगर, महेश बँक, रायगड चौक, लोकमान्यनगर, तोरणानगर, आदर्शनगर, गणपती मंदिर, पवननगर भागात सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तर शुभम पार्क, राजरत्ननगर, महाकाली चौक, मर्चंट बँक, उंटवाडी विभाग, तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क या भागात दुपारचा पाणी पुरवठा होणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news