जलसंधारणात ‘महाराष्ट्र’ देशात अव्वल; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

जलसंधारणात ‘महाराष्ट्र’ देशात अव्वल; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

पुढारी ऑनलाईन: केंद्रीय जलशक्ती प्रसिद्ध केलेल्या जलसंधारणाच्या आकडेवारीनुसार, जलसंधारण योजना राबवण्यात देशात महाराष्ट्र  पहिल्या क्रमांकावर आहे. हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२६) त्यांच्या ट्विटरवरून दिलेल्या माहिती म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जलशक्ती मंत्रालयाने जलसंधारण आकडेवारीचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, महाराष्ट्रात जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर आणि यशस्वीपणे राबवण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक जलसंधारणाच्या योजना महाराष्ट्राने राबविल्या आहेत, असेही देखील ते म्हणाले.

यशस्वी जलसंधारण योजनेमुळे महाराष्ट्राला यापुढे पाण्याची समस्या जाणवणार नाही. यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, त्यास अनुसरून विविध योजना देखील यशस्वीपणे सरकार राबवित आहे, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटवर दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news