watch video : रक्त गोठविणाऱ्या थंडीत 55 वर्षीय जवानाने मारले तब्बल ६५ पुशअप्स

watch video : रक्त गोठविणाऱ्या थंडीत 55 वर्षीय जवानाने मारले तब्बल ६५ पुशअप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान उत्तराखंड हिमालयात शून्य अंश सेल्सियसपेक्षा कमी असलेल्या तापमानात गस्त घालताना दिसतात. आटीबीपीद्वारे नुकताच एक व्हिडिओ (watch video) ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओत लडाखमध्ये १७,००० फूट उंचीवर आणि उणे ३० अंश सेल्सियस तापमानात आयटीबीपीचा ५५ वर्षीय जवान रतन सिंह सोनल यांनी ६५ पुशअप्स काढून लोकांचा आश्चर्यचकीत केले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये कमांडेंट रतन सिंह लडाखच्या बर्फाळ पर्वतावर, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून तब्बल १७, ००० फूट उंच असणाऱ्या ठिकाणी पुशअप्स मारताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब ही की, हा जवान उणे ३० अंश सेल्सियसवर गेलेला आहे. या जवानाचं वय ५५ वर्षं इतकं आहे. या वयात त्यांनी अत्यंत प्रतिकूल वातावरणात ६५ पुशअप्स काढल्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून रतन सिंह यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

आयटीबीपी हे देशातील आघाडीवरील अर्धसैनिक बल

भारत-तिबेट सीमा पोलीसांचा संच हा १९६२ मध्ये निर्माण करण्यात आले. आयटीबीपीच्या जवानांना सीमेवरील गस्तशिवाय नक्षलवादी विरोधी अभियानामध्ये किंवा ऑपरेशनमध्ये तैनात केले जाते. आयटीबीपी हे देशातील आघाडीचे अर्धसैनिक बल आहे. या बलातील सैनिक हे कठोर ट्रेनिंग आणि व्यावसायिक दक्षतेसाठी ओळखले जाते. (watch video)

त्याचबरोबर कोणत्याही प्रतिकूल परिस्थित आणि आव्हानांशी दोन हात करण्यासाठी त्वरीत तत्पर असतात. वर्षभर हिमालयाच्या कुशीत बर्फाने झाकलेल्या आघाडीवरच्या चौक्यांमध्ये राहून देशाची सेवा करणे, ही आयटीबीपीच्या जवानांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना 'हिमवीर' नावानेही ओळखले जाते.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news