गणेशोत्सव कसा साजरा व्हायचा, कलाकारांनी जागवल्या आठवणी

वागले की दुनिया
वागले की दुनिया
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'वागले की दुनिया' मालिकेतील लोकप्रिय कलाकार मंडळी आनंद आणि भक्तिभावाच्या सागरात डुंबून जाण्यासाठी सज्ज झाली आहे. भगवान गणेशाचे हृदय आणि घरात स्वागत करण्याची तयारी ते करत आहेत. सोनी सबवरील वागले की दुनिया या मालिकेत कलाकार काय म्हणतात पाहुया.

राजेश वागळेची व्यक्तिरेखा साकारणारा सुमीत राघवन म्हणाला की, "मुंबईतच माझा जन्म झाला आणि येथेच मी लहानाचा मोठा झालो. मला आजही लख्खपणे आठवते की एक बालक म्हणून गणेश मूर्तीला घरी आणण्यासाठी मीही माझ्या पालकांसोबत जायचो. घराघरात या सणाची मोठी उत्सुकता आहे. प्रेक्षणीय सजावट आणि 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोषाने निर्व्याज भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण तयार केले आहे. त्याने मला श्रद्धेचे महत्त्व आणि एकजुटीच्या मूल्यांची शिकवण दिली आहे. इतकेच नव्हे तर आजही मी जेव्हा माझ्या कुटुंबासोबत गणेश चतुर्थी साजरी करतो तेव्हा मला त्या संस्मरणीय क्षणांची आठवण झाल्याविना राहत नाही. आमच्या वागळे परिवाराप्रमाणेच हा सण एकजूटता आणि प्रेमाची शिकवण देणारा आहे. ज्या प्रमाणे राजेश हा त्याचे कुटुंब जोडून ठेवतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पा सर्वांना एकमेकांच्या जवळ आणतात. या वर्षी मी वैयक्तिकरीत्या आपल्या प्रियजनांसोबत हे सणवार आणि एकजुटीकडे मोठ्या आशेने पाहत आहे."

वागले की दुनिया मालिकेत वंदनाची भूमिका निभावणारी परिवा प्रणती म्हणाली की, "गणपती बाप्पा हे सर्व विघ्ने दूर करणारे देवता आहेत. मला वाटते की, हा सण आपल्याला आपल्या स्वप्नांच्या आणखीच जवळ नेतो. या काळात लोक प्रेम, एकता आणि भक्तिभावाने झळाळून उठलेले असतात. 'वागले की दुनिया'मधील आपल्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून ज्या मौलिक गोष्टी आम्ही सांगू पाहतो, अगदी त्याच्याशी या सणाची तत्वे तंतोतंत जुळतात, हे पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. पडद्यावर आणि पडद्यामागे आमच्यातील अत्यंत घनिष्टतेचेच हे प्रतिबिंब आहे. वैयक्तिकरीत्या सांगायचे झाले तर एखाद्या टिपिकल भारतीय कुटुंबाप्रमाणेच आम्ही अस्सल उत्साहाने हा सण साजरा करतो. आमच्या आयुष्यात गणपती बाप्पांचे स्वागत करण्यासाठी कुटुंबातील सर्व जण खुल्यादिलाने एकत्रित येतात. माझ्यासाठी तर गणेश चतुर्थीचा काळ हा आपल्या प्रियजनांसोबत एकत्रित येण्याचा आणि ज्यामुळे आपले आयुष्य सुंदर बनते अशा बंधनाची जपणूक करण्याचा क्षण असतो."

सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेत श्रीनिवास वागळेची व्यक्तिरेखा चितारणारे अंजन श्रीवास्तव म्हणाले की, "हा सण आमच्या कुटुंबाच्या एकतेचे प्रतीक आहे. गणपती बाप्पांचे आशीर्वाद आम्हाला सदोदित मार्गदर्शन करत राहतील. जेव्हा बाप्पांचे नाव येते तेव्हा मला श्रद्धा आणि नात्याची गहिरी अनुभूती होत असते. विद्वत्ता आणि सर्वसमावेशकतेची शिकवण हा तर आमची मालिका वागले की दुनियाचा गाभा आहे. माझ्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कुटुंबासोबत जेव्हा मी हा सण साजरा करत असतो तेव्हा ही शिकवण मला सदैव प्रेरणा देत असते."

राधिका वागळेची भूमिका करणाऱ्या भारती आचरेकर म्हणाल्या की, "आयुष्याचा खरा आनंद हा छोटछोट्या गोष्टींतच दडलेला असतो, आपल्या प्रियजनांसोबत निस्सिम प्रेमाची सुंदर आठवण हा सण करून देत असतो. अशाच प्रमाणे आमची मालिकाही याच मूल्यांवर आधारित आहे. मी एका पारंपरिक मराठी कुटुंबात वाढले. गणेश चतुर्थीचा सण आमच्यासाठी नेहमीच भव्यदिव्य राहायचा. घरी गणरायाची प्रतिष्ठापना केल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रचंड सकारात्मकता आणि दिव्यत्व झळकते. आणि बहुतेक याच गोष्टी वागले की दुनियाच्या मूल्यांशी खूप खोलवर साधर्म्य साधतात. हा आयुष्यातील गोडव्याचा उत्सव आहे, आणि मी सर्वात आतुरतेने एका गोष्टीची वाट पाहतेय, ते म्हणजे मोदक!"

सखी वागळेची भूमिका करणारी चिन्मयी साळवी म्हणाली की, "गणेश चतुर्थी हा माझ्या सर्वांत आवडत्या सणांपैकी एक आहे, मी दरवर्षी त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. मी आणि माझी चुलत भावंडे दरवर्षी एक अनुष्ठान करतोच. ते म्हणजे आम्ही सर्व एकत्र येतो आणि आमच्याच हाताने शाडू मातीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करतो. आमच्यासाठी हा खूप आनंदाचा आणि नाती घट्ट करणारा विधी असतो. आणि जेव्हा मूर्ती तयार होते त्या उपलब्धीची भावना नेहमीच अनमोल असते. माझ्यासाठी ही केवळ परंपरा नाही. या उलट ती तर संबंध घनिष्ठ करणे आणि मैत्रीच्या भावनेचा उत्सव साजरा करणे आहे. वागले की दुनियात आपण जशी घनिष्ठ समुदाय बघतो, तसेच माझे आयुष्य आहे."

अथर्व वागळेची व्यक्तिरेखा साकारणारा शाहीन कपाही म्हणाला की, "गणेश चतुर्थी ही उत्साह आणि सकारात्मकतेसोबत नवीन प्रारंभ करण्याच्या भावनेचे प्रतीक आहे. मालिकेतील कथानकानुसार आमच्या घरात गणरायांचे आगमन होते. 'वागले की दुनिया'तील कलाकार मंडळींसोबत गणेश चतुर्थीचा सण साजरा करणे खूप हृदयस्पर्शी अनुभव होता. कलाकारांची एकता आणि मैत्रीची भावनेतही याच सणांचा अर्क उतरलेला आहे. मला वाटते उत्तुंग भरारी आणि यशासाठी बाप्पांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. या वर्षी माझ्या ऑनस्क्रीन कुटुंबासोबत आगामी प्रवासासाठी गणरायांची कृपा व्हावी, हेच माझे मागणे आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news