पुणे: राहायला एकीकडे अन् मतदान दुसरीकडे!

पुणे: राहायला एकीकडे अन् मतदान दुसरीकडे!
Published on
Updated on

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन योजने (एसआरए) अंतर्गत आणि इतर कारणास्तव महापालिकेकडून नवीन ठिकाणी स्थलांतरित केलेले अनेक नागरिक राहायला एकीकडे आहेत. मात्र, त्यांना मतदान दुसरीकडे करावे लागत आहे. अन्यत्र स्थलांतरित झालेल्या एक गठ्ठा मतदारांचा इच्छुकांना मोठा फायदा होणार आहे. महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून, त्यासाठी 31 मे 2022 रोजी पर्यंत नोंदणी असलेले मतदार आयोगाने निश्चित केले आहेत. मात्र, त्यापूर्वी शहरात मेट्रो, प्रकल्प बाधित, तसेच एसआरएअंतर्गत अनेक भागांतील झोपडपट्टयांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या नागरिकांचे स्थलांतर झाल्यानंतर त्यांच्या मतदार यादीतील पत्त्यात बदल करणे आवश्यक आहे.

मात्र, त्याकडे प्रशासन, तसेच नागरिकांकडूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने आता या नागरिकांचे मतदान जुन्या भागात आहेत, तर राहायला ते इतर प्रभागांत आहेत. तर, शहरात प्रभाग रचनेतही मोठे बदल झाले आहेत. त्याच भागात पुनर्वसन झालेले असले, तरी जुने नाव एका प्रभागात आणि आता राहायला दुसर्‍या प्रभागात आहेत. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे ते सध्या राहत असलेल्या नवीन पत्त्यानुसार येणार्‍या प्रभागात ठेवावीत की मतदार यादीतील पत्त्याानुसार त्यांच्या पूर्वीच्या प्रभागात ठेवावीत, याबाबत निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती.

त्यावर उत्तर देताना आयोगाने आयोगातर्फे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, वगळणे अथवा दुरुस्त याबाबत मतदार नोंदणी अधिकार्‍यांमार्फत मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान सदर नागरिकांनी आपल्या नवीन पत्त्यावर त्यांची नावे स्थलांतरित करुन घेणे आवश्यक होते, यामुळे आता या नागरिकांची नावे ते सध्या राहत असलेल्या नवीन पत्त्यानुसार संबंधित प्रभागात समाविष्ट करता येणार नाहीत. त्यामुळे, या नागरिकांची नावे मतदार यादीतील पत्त्यानुसार, जुन्याच प्रभागात ठेवावीत, असे आयोगाने महापालिकेस कळविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news