धुळे-नंदुरबार लोकसभेसाठी शिरपूर आणि साक्री मधून मतदानास सुरुवात

नंदुरबार लोकसभेसाठी शिरपूर आणि साक्री मधून मतदानास सुरुवात झाली असून माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
नंदुरबार लोकसभेसाठी शिरपूर आणि साक्री मधून मतदानास सुरुवात झाली असून माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

धुळे : पुढारी वृत्तसेवा
नंदुरबार लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तसेच साक्री येथे मतदारांनी आपला हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत राज्याचे माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर येथे मतदानाचा हक्क बजावला.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुका नंदुरबार लोकसभेसाठी जोडण्यात आलेला आहे. आज सोमवार (दि.१३) रोजी नंदुरबार लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली असून  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी क्रांतिवीर शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालय, वरवाडे, ता. शिरपूर येथे सकाळी 7.30 वाजता मतदानाचा हक्क बजावला. सोबत नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे देखील उपस्थित होते.

शिरपूर येथील माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी क्रांतिवीर शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालय, वरवाडे, ता. शिरपूर जि. धुळे येथे सकाळी 8.15 वाजता मतदानाचा हक्क बजावला. सोबत सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, बहिण कक्कूबेन पटेल, श्रीमती किरणबेन पटेल उपस्थित होते तर शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील सुळे येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर नंदुरबार जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत या पहिल्या दोन तासात 8.93 टक्के मतदान झाले आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news