Volvo C40 New Car : Volvo कंपनीची नवीन इलेक्ट्रीक कार ‘या’ तारखेला होणार लॉन्च

Volvo C40 New Car : Volvo कंपनीची नवीन इलेक्ट्रीक कार ‘या’ तारखेला होणार लॉन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कार चाहत्यांना लवकरच एक नवीन लक्झरी एसयुव्ही कार पाहायला मिळणार आहे. ही इलेक्ट्रीक कार (Electric Car) कुपे एसयुव्ही (Coupe SUV)  प्रकारातील असणार आहे. व्होल्वो ऑटो इंडिया (Volvo Auto India) या कंपनीची ही नवीन कार आहे. हे नवीन इलेक्ट्रिक कार मॉडेल भारतात लॉन्च करण्याविषयीची कंपनीने माहिती दिली आहे. (C40 New Car)

C40 Recharge coupe असे या नवीन SUV कारचे नाव आहे. कंपनीने या कारच्या लॉन्चिंगची अधिकृत तारीख देखील जाहीर केली आहे. ही लक्झरी एसयूव्ही जून महिन्यात भारतात प्रदर्शित करण्यात आली होती. आता या कारचे ऑनलाईन पद्धतीने बुकिंग सुरू होणार आहे. ४ सप्टेंबर रोजी ही कार भारतात लॉन्च करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. (Volvo New Car)

New Car : Volvo C 40 कारचे डिझाइन आणि लुक

सध्या भारतीय बाजारपेठेत Volvo ची XC40 रिचार्ज ही कार ग्राहकांना  पाहायला मिळते. आता C40 Recharge ही लक्झरी एसयुव्ही बाजारात येणार आहे. XC40 Recharge च्या तुलनेत कूपे रूफलाइन पहायला मिळते. त्यामुळे या कारच्या लुकमध्ये मोठा बदल हा रुफलाईनमध्ये पहायला मिळेल. तसेच, याला रॅक केलेले विंडस्क्रीन आणि एलईडी टेललाइट्स असतील, ज्यामुळे नवीन कारचा लुक उठावदार दिसेल. याशिवाय या कारच्या मागील बाजूच्या टेलगेटमध्येही फरक आढळून येईल. टेललाइट्स रॅपराउंड इफेक्टसह नवीन रिव्हर्स लाइट्ससह स्लीम आणि रुंद आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंवरुन C40 Recharge ची फ्रंट स्टाईल XC40 रिचार्ज प्रमाणेच दिसते.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news