पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले वर्षभर रशिया युक्रेन हे युद्ध चालू आहे. या युद्धात दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या भुमिका सर्वज्ञात आहेत. या युद्धाच्या संघर्षाला पुतीन आणि झेलेन्स्की अशी देखील ओळख आहे. युद्धाबाबत अनेक माहिती नव्याने समोर येत आहे. हे युद्ध कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र झेलेन्स्की यांच्या आजच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा या वादावर ठिणगी पडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. व्लादिमीर झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याविषयी काही महत्त्वपूर्ण मुद्दे चर्चेत आणले आहेत. (Russia-Ukraine Upadates)
व्लादिमीर झेलेन्स्की यांनी हुकूमशहा व्लादिमीर पुतीन हे जिवंत आहेत की नाही याबद्दल शंका व्यक्त केली आहे. "या विषयावर कोणाशी कसे बोलावे हे मला समजत नाही. मला खात्री नाही की सध्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष हे खरोखरच तेच आहेत का?" एका कार्यक्रमामध्ये त्यांना विचारले असता झेलेन्स्की यांना शांततेच्या चर्चेबद्दल विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Russia-Ukraine Upadates)
युक्रेनियन नेत्याने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाला संबोधित केले. यावेळी त्यांनी रशियावरील आगामी हल्ल्यांपूर्वी आपल्या मित्र राष्ट्रांना आपल्या सैन्याला अधिक शस्त्रे पाठवण्याचे आवाहन देखील केले आहे.
याआधी देखील पुतीन यांच्या जीवंत असल्याविषयीची शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी पुतीन यांच्याबाबत धक्कादायक दावा केला होता. एका अहवालात या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, पुतीन बहुधा मरण पावले आहेत आणि सार्वजनिक मेळाव्यात एक सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने त्यांची जागा घेतल्याची शक्यता वर्तविली गेली होती.
हेही वाचा