पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी अणू युद्धाच्या दिशेने जाण्याचे संकेत दिलेले आहेत. हा दावा यासाठी केला आहे की, पुतीन यांनी आपल्या सैन्याला न्युक्लिअर वाॅर ड्रिलचा अभ्यास करण्याचे आदेश दिलेले आहेत. इतकंच नाही, पुतीन यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबियांनाही सायबेरियामध्ये पाठवले आहे. (Vladimir Putin)
पुतीन यांच्या निर्णयाने किती मोठी परिणाम होऊ शकतो, याच्या अंदाजानेच क्रेमलिनच्या (रशियाचे राष्ट्रपती कार्यालय) अधिकाऱ्यांनाही भीती वाटत आहे. काही विश्लेषकांच्या मते २५ दिवसांनंतर युक्रेनने युद्धातून माघार घेतली नाही, यासाठी पुतीन हे खूपच नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता ही युक्रेनला नेस्तनाबूत करण्याचे आव्हान स्वीकारलं आहे. पुतीन यांनी वाटत होतं की, हा छोटासा देश आपल्याला काय आव्हान देणार? पण, युक्रेननेही कडवी झुंज दिली आहे.
क्रेमलिनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुद्द पुतीन यांनीच अणू युद्धाचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुतीन यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती अजूनही कोणालाच माहीत झालेली नाही. माज्ञस रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर काही तज्ज्ञांनी दावा केला आहे की, पुतीन यांनी आपल्या कुटुंबियांना सायबेरियाच्या अल्ताई पर्वतात असणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाने बनविलेल्या बंकरमध्ये स्थलांतरीत केलेले आहे, जे संपूर्ण भूमिगत शहर आहे. (Vladimir Putin)
पुतीन यांच्याकडे एक खतरनाक योजना तयार केली जात आहे, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. अणूयुद्धासाठी रशियाकडे डुम्सडे विमान आहेत. ज्याचा उपयोग पुतीन आणि त्याचे निकटवर्तीय यांच्याद्वारे अणू युद्धात केला जाईल. एक स्काई बंकदेखील डुम्सडेच्या प्लॅनमध्ये आहे, मात्र असं सांगितलं जात आहे की, ते अजून पूर्ण झालेले नाही.
पहा व्हि़डिओ : युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात