नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राम मंदिराऐवजी बाबरी बांधण्यासारखे काँग्रेसचे दिवास्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेद्वारे आज (दि.७ मे) करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला तरी राहुल गांधी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद बांधतील, असा खुलासा काँग्रेसच्या एका जुन्या ज्येष्ठ नेत्याने केल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ.सुरेंद्र जैन यांनी केला. (Vishwa Hindu Parishad)